विना सीसीटिव्ही या 5 अ‍ॅप्सद्वारे करा घराची देखरेख

अनेकदा सीसीटिव्ही महागडे वाटत असल्याने आपण घरामध्यी सीसीटिव्ही बसवत नाही. मात्र अशावेळी अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्ही बाहेर असताना देखील घरावर लक्ष्य ठेऊ शकता. तुम्ही प्रवास करत असाल अथवा परदेशात असाल तरी देखील घराची व घरातील सदस्यांची माहिती अ‍ॅपद्वारे मिळू शकता. सीसीटिव्हीचे काम करणाऱ्या अशाच काही अ‍ॅप्सबद्दल जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

मेनीथिंग (Manything) –

जर तुम्हाला घरात सीसीटिव्ही कॅमेरे लावणे महाग वाटत असेल, तर तुम्ही जुन्या स्मार्टफोन्सची मदत घेऊ शकता. या स्मार्टफोनचा कॅमेरा चांगला हवा व फोन वाय-फाय कनेक्ट असावा. मेनीथिंक असेच एक मोफत अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप गती अथवा आवाजाचा तपास करते व काही विचित्र दिसल्यावर अलर्ट देखील करते. तुम्ही तुमच्या मुख्य फोनवर देखील लाईव्ह स्ट्रिम पाहू शकता.

Image Credited – Amarujala

प्रोटॉनव्हीपीएन (ProtonVPN) –

अँड्राईड युजर्ससाठी अनेक व्हीपीएन सेवा उपलब्ध आहेत. मात्र प्रोटॉन व्हीपीएनद्वारे विना बँडविड्थ सीमेद्वारे मोफत उपयोग करता येतो. हे अ‍ॅप सुरक्षा व गोपनियतेवर लक्ष केंद्रीत करते.

Image Credited – Amarujala

एव्हा 24/7 Accessibility –

ज्यांना ऐकण्यास अडचण येते, अशांसाठी हे  अ‍ॅप फायदेशीर आहे. हे समोरील व्यक्तीचे बोलणे ऐकते व ते स्क्रीनवर दाखवते. तुम्हाला त्या व्यक्तीने उच्चारलेले शब्द स्क्रीनवर दिसतील. हे अ‍ॅप तुमचा आवाज देखील शिकू शकते. त्यामुळे तुम्ही बोलताय की इतर दुसरी व्यक्ती हे देखील अ‍ॅप ओळखते.

Image Credited – Amarujala

सेरबर्स पर्सनल सेफ्टी (Cerberus Personal Safty) –

हे अ‍ॅप तुम्हाला तुमच्या मित्रांचे व नातेवाईकांचे रिअल टाइम लोकेशन पाठवण्यास मदत करते. या अ‍ॅपमध्ये मॅप ब्राउजर देखील आहे.

Image Credited – Amarujala

ट्रॅव्हल सेफ प्रो (TravelSafe Pro) –

संकटाच्या वेळी एखादी महत्त्वपुर्ण माहिती हवी असेल, तर या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही माहिती त्वरित मिळवू शकता. परदेशात प्रवास करताना हे अ‍ॅप फायदेशीर ठरते. पोलीस, हॉस्पिटल, अग्निशामक दल आणि दुतावासाची माहिती त्वरित देते.

Leave a Comment