…अन् जिवित व्यक्तीला सापडले स्वतःचेच थडगे

जिंवतपणीच एखाद्या व्यक्तीला मृत घोषित करून आधीपासूनच त्याची कबर (थडगे) बांधली आहे असे स्वतःबद्दल समजले तर ? नक्कीच धक्का बसेल. स्कॉटलँडच्या टेयसाइड येथे राहणाऱ्या 75 वर्षीय एलन हेटेल यांच्याबरोबर असेच घडले आहे. आपली स्वतःचीच कबर पाहून त्यांना धक्काच बसला. मागील 4 महिन्यांपासून ते कोणाच्याच संपर्कात नव्हते. त्यांना कोणीही फोन करत नव्हते व भेटायला देखील येत नव्हते. असे का होत आहे ? यामुळे ते चिंतेत होते.

त्यांनी याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना समजले की त्यांचे तर निधन झाले आहे व कबर देखील बांधण्यात आली आहे.

एलन म्हणाले की, यामागे त्यांच्या पहिल्या पत्नीचा हात आहे. 2 वर्षांपुर्वी ते वेगळे झाले होते. मेल्यानंतर दोघांना एकाच जागी दफन करण्यात यावे अशी तिची इच्छा होती.

स्थानिक काउंसिलचे म्हणणे आहे की, कबर बुकिंगसाठी जमीन खरेदी करणे ही खाजगी गोष्ट आहे. त्यामुळे हा प्लॉट कोणी खरेदी केला ते सांगू शकत नाहीत.

एलन यांनी सांगितले की, कबरवर त्यांच्यासोबत त्यांच्या पहिल्या पत्नीचे देखील नाव आहे. स्वतःची कबर बघून ते अस्वस्थ झाले. ते म्हणाले की, मी पुरण्याच्या नाही तर अंत्यसंस्कार करण्याच्या बाजूचा आहे. या कबरमुळे सामाजिक जीवन संपुष्टात येत आहे. लोकांना वाटत आहे की, माझा मृत्यू झाला आहे. मात्र मी तर जिवंत असून, अगदी व्यवस्थित आहे.

Leave a Comment