पहा १० रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिस्लेरी पिणारा गरीब माणूस


मुंबई – प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दहा रुपयात ‘शिवथाळी’ योजनेला सुरुवात झाली असून विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते केंद्रांचे उद्धाटन करत शिवथाळी योजनेची सुरुवात करण्यात आली. एका केंद्राचे उद्घाटन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्तेदेखील करण्यात आले. पण जितेंद्र आव्हाड यावेळी एका गोष्टीमुळे यांना ट्रोल केले जात आहे. जितेंद्र आव्हाड यांनी उद्घाटन केल्यानंतर शिवथाळीचा आस्वाद घेत असताना सोबत पाणी पिण्यासाठी बिस्लेरी बाटली घेतली होती. शिवथाळीपेक्षा जास्त बिस्लेरी बाटलीची किंमत असल्याने जितेंद्र आव्हाड यांना ट्रोल केले जात आहे.


यावरुन जितेंद्र आव्हाड यांच्यावर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष यांनीदेखील टीका केली आहे. १० रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिस्लेरी पिणारा गरीब माणूस असा टोला त्यांनी लगावला आहे. शिवसेनेने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात गोरगरिबांसाठी सवलतीच्या दरात भोजन मिळावे म्हणून दहा रुपयात शिवथाळी योजना जाहीर केली होती. या योजनेच्या तयारीचा आढावा शुक्रवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व जिल्ह्य़ांच्या पुरवठा अधिकाऱ्यांकडून घेतला.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे नाही. मुख्यत्वे गोरगरीबांसाठी ही योजना आहे. नैतिकतेच्या आधारावर तिचा लाभ घेतला जावा, असे सरकारला अभिप्रेत आहे. थाळीत पोळी, भाजी, वरण, भात आदींचा समावेश राहील. दुपारी १२ ते दोन या वेळेत सर्वसामान्यांना शिवभोजनाचा लाभ घेता येईल.

Leave a Comment