कोण होता हेलिकॉप्टर अपघातात निधन पावलेला कोबी ब्रायंट?

प्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटचा अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. त्याच्यासोबत या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये कोबीच्या 13 वर्षीय मुलीचाही समावेश आहे. जगभरातूनन अनेकांनी या महान खेळाडूला श्रध्दांजली अर्पण केली.

41 वर्षीय कोबी गेली 20 वर्ष लॉस एंजिलस लेकर्ससोबत जोडलेला होता. या काळात त्याच्या टीमने 5 वेळा एनबीए चॅम्पियनशीप खिताब आपल्या नावावर केला. कोबीचे नाव जगातील सर्वोत्तम बास्केटबॉल खेळाडूमध्ये घेतले जाते.

Image Credited – nbcnews

कोबी ब्रायंटचा जन्म 23 ऑगस्ट 1978 ला फिलाडेल्फिया येथे झाला होता. ब्रायंटने शाकिल ओ नीलसोबत मिळून लेकर्सला 2000, 2001 आणि 2002 असे सलग तीन खिताब जिंकून देण्यास महत्त्वाची भूमिका बजावली होती. या प्रकारे तो वयाच्या 23व्या वर्षी तीन खिताब जिंकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला होता.

त्यानंतर ब्रायंटच्या नेतृत्वाखील लेकर्सने 2009  व 2010 साली एनबीएचा खिताब आपल्या नावावर केला. त्याच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या संघाने ऑलिम्पिकमध्ये 2008 आणि 2012 मध्ये सुवर्ण पदक जिंकण्याची कामगिरी केली होती.

Image Credited – Quartz

आपल्या कारकिर्दीमध्ये ब्रायंटने एकूण 33,643 पॉइंट्स केले. त्याला 18 वेळा एनबीए ऑल स्टार म्हणून देखील निवडण्यात आले होते. 2008 मध्ये त्याने एनबीएचा सर्वोत्तम खेळाडू हा किताब पटकावला होता.

बास्केटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने लहान मुलांसाठी अनेक पुस्तके लिहिली. त्याने लिहिलेल्या डिअर बास्केटबॉल चित्रपटाच्या स्क्रिप्टसाठी शॉर्ट अॅनिमिटेड फिल्मसाठी मागील वर्षी ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला होता.

Leave a Comment