हे आणल्या शिवाय घरी येऊ नको, दीपिकाची रणवीरला तंबी


बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांमध्ये ‘दीपवीर’ म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांची गणती होते. हे जोडपे सोशल मीडियावरही आपल्या फोटोंमुळे कायम चर्चेत असतात. या दोघांची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘छपाक’ चित्रपटामुळे दीपिका चर्चेत आली होती. तर, आपल्या आगामी ‘८३’ चित्रपटामुळे रणवीर सिंहदेखील चर्चेत आहे.

‘८३’ चित्रपटाचे दमदार टीझर पोस्टरही रणवीर सिंहने शेअर केले आहे. तसेच त्याने सोशल मीडियावर या चित्रपटातील कलाकरांसोबतचाही एक फोटो पोस्ट केला आहे. चाहत्यांनी या पोस्टवर भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, यामध्ये दीपिकाने केलेली कमेंट ही व्हायरल होत आहे.

रणवीरच्या फोटोवरील कमेंटमध्ये दीपिकाने लिहिले आहे, की १ किलो मैसुरपाक आणि अडीच किलो मसालेदार हॉट चिप्स आणल्याशिवाय घरी परत येऊ नको. चाहत्यांनी दीपिकाच्या या कमेंटवरही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘८३’ च्या पोस्टर लॉन्च कार्यक्रमासाठी रणवीरने चेन्नई येथे हजेरी लावली होती. रणवीर या चित्रपटात कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत ताहिर राज भसीन, साकिब सलिम, जतीन सारना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधु, साहिल खट्टर, एमी विर्क, आदिनाथ कोटारे, धैर्य करवा आणि पंकज त्रिपाठी ही स्टारकास्ट देखील झळकणार आहे. कबीर खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर हा चित्रपट १० एप्रिलला रिलीज होणार आहे.

Leave a Comment