या देशांचे संविधान अलिखित स्वरूपात, असे चालते शासन

काल भारताने आपला 71वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. 26 नोव्हेंबरला भारतीय संविधान सभेद्वारे संविधान स्विकारण्यात आले व 26 जानेवारी 1950 ला ते लागू झाले. भारताचे संविधान हे लिखित स्वरूपातील आहे. यातील अनेक गोष्टी वेगवेगळ्या देशातील संविधानांपासून घेण्यात आलेल्या आहेत. मात्र जगात असेही काही देश आहेत, ज्यांचे संविधान हे अलिखित स्वरूपात आहे. हे देश जुने कायदे व आधी दिलेल्या घटनांच्या निर्णयावर शासन चालवतात. या देशांबद्दल जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

ब्रिटन –

इंग्रजांनी जवळपास 200 वर्ष भारतावर राज्य केले. मात्र त्यांचा स्वतःचा देश इंग्लंड अर्थात युवायटेड किंगडमचे संविधान अलिखित स्वरूपातील आहे. येथे सुरुवातीपासूनच काही नियम ठरलेले आहेत. त्याच आधारावर शासन चालवले जाते. हे नियम संविधानाच्या अधिनियमांएवढेच महत्त्वाचे आहेत. इंग्लंडचे कायदे वेळ व परिस्थितीनुसार बदलता येतात.

Image Credited – Amarujala

सौदी अरेबिया –

सौदी अरेबियाच्या विचित्र कायद्यांबद्दल तर तुम्हाला माहिती असेलच. या देशाचे देखील कोणतेही लिखित संविधान नाही. येथे कुराणामध्ये लिहिलेल्या गोष्टींनाच आधार मानला जातो. मात्र हा लोकशाही असलेला देश नाही.

Image Credited – Amarujala

इस्त्रायल –

वर्ष 1948 मध्ये स्वातंत्र्य झालेल्या इस्त्रायलचे लिखित संविधान नाही. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरु झाली होती. मात्र संसदेतील भेदभावामुळे संविधान प्रक्रिया पुर्ण झाली नाही.

Image Credited – Amarujala

न्यूझीलंड –

न्यूझीलंडचे देखील लिखित संविधान नाही. अलिखित संविधानाच्या आधारावरच येथील न्यायव प्रशासनिक व्यवस्था चालते. आधीच्या कायद्यांद्वारे व दिलेल्या निर्णयांवर येथील शासन चालवले जाते.

Image Credited – Amarujala

कॅनडा –

कॅनडाच्या संविधानाबद्दल वाद आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की येथे अलिखित संविधानाद्वारे शासन होते. तर काहींच्या मते, येथे लिखित संविधान आहे. असे म्हटले जाते की, कॅनडाचे संविधान लिखित आहे, मात्र येथील सरकार अलिखित संविधानाच्या नियमाचे पालन करते.

Leave a Comment