बीटीएस बँडच्या 7 मायक्रोफोनची झाली एवढ्या लाखांना विक्री

दक्षिण कोरियन बँड बीटीएसद्वारे वापर करण्यात आलेल्या 7 मायक्रोफोनचा लिलाव करण्यात आला आहे. या 7 मायक्रोफोनची विक्री 59 लाख रुपयांना झाली. ही रक्कम चॅरिटीला देण्यात येणार आहे. लिलावात मायक्रोफोनसाठी अपेक्षे पेक्षा 8 पट अधिक बोली लागली.

या मायक्रोफोनचा वापर बीटीएसद्वारे 2017 ते 2019 या दरम्यान लव यूरसेल्फ टूरच्या वेळी केला होता. ज्युलियन ऑक्शननुसार, पहिल्यांदा ऑटोग्राफ असणारे सर्व मायक्रोफोनची विक्री झाली. यांच्यासाठी 7 ते 15 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा होती.

या लिलावाद्वारे मिळालेली रक्कम रिकॉर्डिंग अकादमी, संगीत जगतातील लोकांच्या आरोग्यासाठी खर्च केली जाणार आहे. लिलावात एअरोस्मिथ, पीट टाउनसेंड, स्टिव्ह निक्स आणि दिवंगत टॉम पेटी सारख्या म्यूजियशनच्या वस्तू देखील विकल्या गेल्या.

यंदाच्या प्री ग्रॅमी अ‍ॅवॉर्डमध्ये देखील बीटीएस बँडला आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळाली आहे.

Leave a Comment