… म्हणून या व्यक्तीने चक्क अंटार्कटिकाच्या बर्फाखाली पोहण्याची केली कामगिरी

थंडीच्या दिवसात लोक थंड पाण्यापासून देखील लांब राहतात. मात्र व्यक्तीने आपल्या कामगिरीने सर्वांनाच हैराण केले आहे. 50 वर्षीय एथलीट लेव्हिस पुघ यांनी हवामान बदलाच्या प्रती लोकांना जागृक करण्यासाठी अंटार्कटिकाच्या थंडीत स्विमिंग केले. त्यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली.

ब्रिटनचेे लेव्हिस अंटार्कटिच्या आइस शीट खाली पोहणारा पहिला एथलीट ठरला आहे. त्यांनी या बर्फाच्छादित प्रदेशात केवळ स्विमिंग अंडरगार्मेंट, एक टोपी आणि गॉगल घालून पोहण्याची कामगिरी केली.

लेव्हिस यांनी ट्विट करत लिहिले की, तुमच्या पर्यंत हा संदेश पोहचण्यासाठी मी पुर्व अंटार्कटिकामध्ये पोहलो. हा भाग वेगाने गायब होत चालला आहे. येथील बर्फ वेगाने विरघळत आहे. आपण हवामान बदलाचा सामना करत आहोत. जगातील नेत्यांनी निर्णय घेण्याची गरज आहे.

लेव्हिस 10 मिनिटे सुप्रा ग्लेशियल लेकमध्ये होते. यावेळी त्यांनी गार्डच्या उपस्थितीत 2.2 वर्ग मीटर अंतर पोहून पार केले.

त्यांनी सांगितले की, मी हे काम कोणत्याही विक्रमासाठी केले नाही. लोकांचे लक्ष हवामान बदलाकडे आकर्षित करण्यासाठी हे केले. लेव्हिसचे लक्ष्य सुप्रा ग्लेशियल लेक पोहून पार करणारा पहिला व्यक्ती बनण्याचे आहे.

Leave a Comment