क्रिकेटपटू वसंत रायजी यांची शंभरी


भारतातील सर्वात वयोवृद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांनी रविवारी वयाची १०० वर्षे पूर्ण केली असून त्यानिमित्त मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर याने ट्विटर अकौंट वर वसंत रायजी यांच्या सोबत त्याचा आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कप्तान स्टीव्ह वॉ यांचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोखाली सचिनने वसंत रायजी यांना वयाची १०० वर्षे पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा देताना आम्ही आपल्यासोबत फार चांगला वेळ घालविला, भूतकाळातील क्रिकेट संदर्भातल्या काही मनोरंजक घटना तुमच्या तोंडून ऐकायला मिळाल्या असे लिहीले आहे. सचिन म्हणतो, आमच्या प्रिय क्रिकेटशी तुमच्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत त्यामुळे आमच्या संचितात वाढ झाली आहे.

वसंत रायजी यांचे करियर १९३९ साली क्रिकेट क्लब ऑफ इंडियामधून सुरु झाले तेव्हा ते १९ वर्षाचे होते. पहिल्या सामन्यात त्यांची कामगिरी चांगली झाली नव्हती. त्यांनी त्याच्या करिअर मध्ये ९ प्रथम श्रेणी सामन्यात २७७ धावा जमविल्या होत्या. लाला अमरनाथ, विजय मर्चंट, सी के नायडू, विजय हजारे यांच्यासोबत त्यांनी ड्रेसिंग रूम शेअर केली होती. त्यानंतर त्यांनी घराच्या सीए फर्म मध्येच काम केले आणि खेळातून निवृत्ती घेतल्यावर सीके नायडू, एलपी जय, व्हिक्टर ट्रम्प यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत.

Leave a Comment