७१ व्या प्रजासत्ताक दिनी सलमान खानचा फिट राहा संदेश


बॉलीवूड दबंग स्टार सलमान खान याने रविवारी देशाच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनी सर्व देशवासियांना शुभेच्छा देऊन फिट राहा असा संदेश दिला आहे. सलमानने हा संदेश देताना मुंबईच्या रस्त्यावरून सायकल चालवितानाचा त्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्याने सर्व देशबांधवानी फिट आणि आरोग्यपूर्ण राहावे असे निवेदन केले आहे.

सलमान फिटनेसच्या बाबतीत अतिशय दक्ष असून तो नियमाने सायकलिंग करतो. अनेकदा शुटींग साठी जाताना तो सायकलवरून जातो. तो जिम मध्ये तासनतास मेहनत करतो. बॉलीवूड मधील फिट कलाकारात त्याचा समावेश आहे. त्याच्या बॉडीवरून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. सलमानने चित्रपटात अनेकदा शर्टलेस शॉट देऊन त्याचा पिळदार देहाचे दर्शन घडविले आहे.

सलमानचा राधे हा चित्रपट या वर्षात येणार आहे. त्यात त्याच्यासोबत दिशा पाटणी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा असतील. त्याची दबंग थ्री फिल्म नुकतीच येऊन गेली मात्र त्याला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. सध्या तो बिग बॉस कार्यक्रमात होस्ट म्हणूनही काम करतो आहे.

Leave a Comment