महाराष्ट्रात पर्यटकांना करता येणार पाणबुडीतून समुद्रदर्शन


फोटो सौजन्य महाराष्ट्र टाईम्स
महाराष्ट्रात पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य पर्यटन विभागाने पर्यटकांसाठी पाणबुडी म्हणजे सबमरीन सेवा उपलब्ध करून देण्याचे काम सुरु केले असून या वर्षअखेर ही सेवा सुरु होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी दिली. ते म्हणजे या प्रकल्पासाठी राज्य सरकारने २५ कोटींचा निधी दिला असून लवकरच निविदा काढल्या जात आहेत.

काळे म्हणाले, काही महिन्यापूर्वीच राज्य शासनाकडून निधी मिळाला होता मात्र आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रकल्पाचे काम सुरु झाले नव्हते ते आता सुरु झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम ही सेवा सुरु होईल आणि त्यासाठी २४ प्रवासी बसू शकतील अशी पाणबुडी वापरली जाईल. या पाणबुडीतून २० मिनिटे समुद्राखाली पर्यटकांना समुद्री जीवन पाहण्यासाठी प्रवास करता येणार आहे. पर्यावरण प्रेमी तसेच समुद्र जीव अभ्यासकांनाही त्याचा फायदा होईल.

उबर ने गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियात अंडरवॉटर सबमरीन सेवा सुरु केली जात असल्याचे घोषणा केली होती. ऑस्ट्रेलियात क्वीन्सलंड मधील बॅरीअर रीफ पाहण्यासाठी ही सेवा उबर सुरु करणार असून त्यात सुरवातीला निवडक प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे असे जाहीर केले गेले होते.

Leave a Comment