प्रिन्स हॅरी आणि मेगनचा कॅनडात नवा आशियाना


ब्रिटीश राजघराण्याचा वारसा सोडून स्वतंत्र आयुष्य जगू इच्छिणाऱ्या प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन व मुलगा आर्ची यांनी कॅनडातील व्हिक्टोरिया शहरात राहण्याचा निर्णय घेतला असून येथे त्यांचा नवा आशियाना तयार आहे असे समजते. ब्रिटीश कोलंबिया जवळ असलेल्या या शहरात समुद्राकाठी हॅरी मेगन यांचे नवे घरकुल सजले आहे.

व्हिक्टोरिया हे नाव या शहराला राणी व्हिक्टोरिया वरून पडले आहे. १९०१ पर्यंत ब्रिटीश साम्राज्याचा विस्तार सुरु होता तेव्हा व्हिक्टोरिया राणी ब्रिटीश गादीवर होती. आजही कोणत्याही ब्रिटीश शहराप्रमाणे या शहरात लाल रंगाच्या डबलडेकर बस उन्हाळ्यात चालविल्या जातात. हे शहर ब्रिटीश शहरांप्रमाणे असल्याने येथे प्रिन्स हॅरी आणि मेगन याना घराच्यासारखे वाटेल असे सांगितले जात आहे.

या शहरात ब्रिटनच्या तुलनेत या जोडप्याला अधिक खासगी आयुष्य जगता येणार आहे. कारण या शहरात पापाराझी कल्चर नाही. ब्रिटन राजपरिवारातील सदस्य जेव्हा कॅनडा भेटीवर येतात तेव्हा या शहराला आवर्जून भेट देतातच पण राणी व्हिक्टोरिया, राणी एलिझाबेथ, प्रिन्स विलियम्स, केट मिडलटन यांनीही या शहरात वास्तव्य केलेले आहे.

Leave a Comment