नारळ आणि शुभकार्याचा काय आहे संबंध?


नारळाचे हिंदू संस्कृतीमध्ये महत्वपूर्ण स्थान असून नारळ कुठलेही शुभ कार्य करण्यापूर्वी जरुर फोडला जातो. नारळाशिवाय कोणत्याही देवी-देवताची पूजा अपूर्ण मानली जाते. पण नारळ कुठलेही शुभ कार्य करण्यापूर्वी का फोडला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, शुभ कार्य करताना नारळ का फोडला जातो.

वरुन जितका कठोर असतो तितकाच सौम्य नारळ आतमध्ये असतो. श्रीफळ असेही नारळाला म्हटले जाते. प्रामुख्याने हिंदू धर्मात शुभ कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी नारळ फोडण्याची प्रथा दिसून येते. वास्तुशांती वेळी तांब्याच्या कलशावर आंब्याच्या पानांमध्ये नारळ ठेवून त्याची पूजा केली जाते. नारळानेच सुवासिनींची ओटी भरतात. एखाद्या कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करताना नारळ दिला जातो.

असे मानले जाते की, ज्यावेळी पृथ्वीवर भगवान विष्णूने अवतार घेतला होता त्यावेळी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचे झाड व कामधेनु या तीन गोष्टी आणल्या होत्या. नारळाच्या झाडाला यामुळे कल्पवृक्ष मानले जाते. नारळामध्ये ब्रह्मा, विष्णु आणि महेश तीनही देवांचा वास मानला गेला आहे.

दर दिवशी ताज्या नारळाची मलई खाल्ल्यास शरीराला आवश्यक असणारे मँगेनीज मिळते. १५ टक्के पोटॅशिअम या मलईत असते जे आपले स्नायू, हाडे आणि पचनसंस्थेला कार्यरत ठेवते. पोटॅशियम आणि क्लोरीन नारळाच्या पाण्यामध्ये असते जे आईच्या दुधासमान असते. नारळ खाल्याने शारीरिक दुर्बलता कमी होते, असे म्हटले जाते.

साक्षात लक्ष्मीचे स्वरूप नारळाला मानले गेले आहे. पैशासंबंधीच्या सर्व समस्या देवाला नारळ अर्पण केल्यास दूर होतात. तसेच घरामध्ये विधि-वत पूजा करून हे नारळ ठेवले तर धनामध्ये वृद्धी होते.नारळ विविध प्रकारच्या भाज्यांमध्येही किसून घालतात ज्यामुळे भाज्या चवदार होतात. नारळाच्या करवंटीपासूनही अनेक वस्तू बनवतात.

Leave a Comment