बायका कधीच बदलू शकत नाही नवऱ्याच्या या सवयी


नवऱ्याच्या अशा अनेक सवयी आहेत ज्या बदलण्याची बायकांना इच्छा तर खूप असते मात्र त्या यामध्ये यशस्वी होत नाहीत. पण त्या आपला प्रयत्न सोडत नाहीत. सतत त्यांच्या पदरात प्रयत्न करून सतत अपयशच येते. तर आज आम्ही तुम्हाला नवऱ्यांच्या अशा काही सवयी सांगतो. ज्यांना क्वचितच तुम्ही कधी बदलू शकाल.

आईसोबत तुलना करणे – पत्नीच्या छोट्या छोट्या गोष्टींची तुलना आपल्या आईसोबत करण्याची नवऱ्याची सवय असते. खास करून जेवणाच्या बाबतीत. अशावेळी नवऱ्यांना काही समजावण कठीण असते. यावर उपाय म्हणून तुम्ही उत्कृष्ठ जेवण बनवणे हे एकच आहे.

क्रिकेटवर असलेले प्रेम – नवऱ्यांना जास्त करून क्रिकेट पाहणे अधिक पसंद आहे. खास करून भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना असेल तर त्याला अधिक रंगत येते. तुम्ही अशावेळी तुमच्या जोडीदाराचे लक्ष केंद्रीत करण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही तुम्ही असफल व्हाल यात शंका नाही.

रस्ता न विचारण्याची सवय – प्रत्येक बायकोला याचा अनुभव तर येत असेल. भले तुम्ही चालून चालून थकाल पण तुमचा जोडीदार इतरांना रस्ता विचारण्याचे कष्ट घेणार नाही. त्यांना असे वाटत असावे बहुदा की तुमच्या समोर रस्ता विचारला तर त्यांचे नाक कापले जाईल. त्यामुळे जोपर्यंत त्यांचे जीपीएस चालू आहे तोपर्यंत तुम्हाला ते चालवतच राहणार.

छोटे छोटे खोटे बोलणे – नवरा कायमच बायको बरोबर होणाऱ्या साध्या सुध्या वादाला टाळण्यासाठी थोड थोड खोट बोलत असतात. किंवा हे खास प्रयत्न आपल्या लाईफ पार्टनरला अधिक खुश ठेवण्यासाठी केले जातात. त्यामुळे महिलांनी समजून घेतले पाहिजे की पती कधी खोट बोलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करायला हवे.

Leave a Comment