झाडूवाली झाली अचानक मॉडेल; काय झाले ते घ्या जाणून


नवी दिल्ली: सोशल मीडिया कोणालाही हिट किंवा फ्लॉप बनवू शकतो. कोणाला लखपती किंवा रोडपती देखील बनवू शकतो. असे दिसून येते की लोक सोशल मीडियावर व्हिडिओ किंवा फोटो अपलोड करतात आणि बघताबघता तो व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होती. अशीच एक गोष्ट ब्राझीलच्या रस्त्यावर झाडू मारणाऱ्या तरुणीची आहे. जी दिसायला खूप सुंदर होती, गरिबीमुळे तिला रस्त्यांवर झाडू मारावा लागत होता. पण सोशल मीडियाने तिला तिच्या यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. चला जाणून घेऊ या कसे ते….


२५ वर्षीय रिटा माटोझ ब्राझीलच्या रस्त्यावर झाडू मारण्याचे काम करीत असे. दररोज प्रमाणे ती आपल्या मित्रांसह रस्त्यावर झाडू मारत होती. त्यादरम्यान तिचा एक फोटो कोणीतरी इंटरनेटवर अपलोड केला. बऱ्याच लोकांनी तिचा फोटो शेअर केला आणि बघताबघता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही लोकांनी तिला सुंदर झाडूवाली असे देखील नाव ठेवले, तर काहींनी ऐवढी सुंदर तरुणी रस्त्यावर झाडू कशी मारू शकते. काहीजणांना तिने मॉडेल बनावे असे वाटले.

Olá meus amores,desejo a todos uma ótima semana😘

A post shared by Rita Mattos Oficial (@ritamattos1) on


काही दिवसातच हे फोटो सगळीकडे व्हायरल झाले आणि या छायाचित्रांनी इंटरनेट विश्वात खळबळ उडवून दिली. बऱ्याच लोकांनी तिला मॉडेलिंग करण्याची ऑफर दिली. पण रिटाला जेव्हा माहीत पडले की आपले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत तेव्हा या गोष्टीवर तिचा विश्वासच बसत नव्हता. परंतु जेव्हा तिला मॉडेलिंगसाठी ऑफर मिळाली तेव्हा तिला खात्री पटली. त्यानंतर तिचे जीवनच बदलून गेले आणि झाडू सोडून तिने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले.


रिटा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कायम सक्रीय असते आणि ग्लॅमरस फोटो अपलोड करत असते. इंस्टाग्रामवर तिचे १ लाख ६६ हजार फॉलोअर्स आहेत. जर सोशल मीडियावर तिचे छायाचित्र अपलोड केले गेले नसते तर आजपण ती झाडूच मारत राहिली असती. पण अचानक तिचे नशीब पालटले आणि आता ती एक यशस्वी मॉडेल आहे.

Leave a Comment