धूम्रपान सोडायचेय, ऑनलाईन व्हा!


सोशल नेटवर्कची सवय लागलेल्यांसाठी खुशखबर! या संकेतस्थळांवर सक्रिय राहिल्याने धूम्रपानाची सवय सोडण्यास मदत होते, असे एका ताज्या संशोधनातून पुढे आले आहे.

आयोवा विद्यापीठ आणि अमेरिकेतील ना-नफा संघटना ट्रूथ इनिशिएटिव्ह यांच्या संशोधकांनी केलेल्या पाहणीतून ही गोष्ट पुढे आली आहे. या संशोधकांनी ‘बीकमएनएक्स’ नावाच्या सोशल नेटवर्कवर सक्रिय असलेल्या 2,600 पेक्षा आणि अधिक तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास केला. त्यांनी 2008 या वर्षी ‘बीकमएनएक्स’ हे संकेतस्थळ तयार केले होते. त्यावर सदस्यांना इतरांसाठी संदेश देणे आणि ब्लॉग, फोरम इत्यादी सुविधा देण्यात आलेल्या आहेत.

‘बीकमएनएक्स’ कम्युनिटीवर अधिक सक्रिय असलेल्या 21 टक्के लोकांनी तीन महिन्यांनंतर धूम्रपान करणे सोडून दिले, असे त्यांना आढळून आले. जे कम्युनिटीवर कमी सक्रिय होते, त्यांच्यात धूम्रपान सोडण्याची शक्यता कमी असल्याचेही त्यांना दिसून आले.

‘‘पहिल्या आठवड्यानंतर तुम्ही ऑनलाईन सोशल नेटवर्कवर किती वेळ घालविता, हे तुम्ही धूम्रपान सोडणार का नाही याचे निदर्शक असते,’’ असे आयोवा विद्यापीठाचे असिस्टेंट प्रोफेसर कांग झाओ म्हणाले.

‘बीकमएनएक्स’चा मुख्य उद्देश धूम्रपान बंद करणे हा आहे, परंतु वापरकर्ते कोणत्याही विषयावर पोस्ट करू शकतात. आतापर्यंत या संकेतस्थळाचे 8,00,000 पेक्षा अधिक वापरकर्ते आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment