मुकेश अंबानींचा राजेशाही थाट


भारतातील सवात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे मुकेश अंबानी आता आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्बस् मॅगझीनने प्रसिद्ध केलेल्या ‘ रियल टाईम बिलियनेअर्स ‘च्या सूचीमध्ये मुकेश अंबानी यांनी पहिले स्थान पटकाविले असून, ४२.१ अरब डॉलर्स, म्हणजेच सुमारे २ लाख, ७३ हजार ६५० कोटी रपये मूल्याच्या संपत्तीचे ते मालक आहेत. चीनच्या हुई यान यांना मागे टाकून मुकेश अंबानी यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळविलेला आहे.

मुकेश अंबानी आपले आयुष्य राजेशाही थाटामध्ये जगणे पसंत करतात. ते रहात असलेले त्यांचे निवासस्थान ‘ अँटीलिया ‘ मुंबई शहरामध्ये असून, ही इमारत सत्तावीस मजली आहे. त्यांच्या या आलिशान निवासस्थानाची साफसफाई, इतर देखभाल करण्याकरिता तब्बल सहाशे नोकरांची फौज येथे तैनात असते. या भव्य इमारतीत १६८ गाड्या पार्क केल्या जाऊ शकतील एवढी जागा असून या घराच्या छतावर हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी तीन हेलिपॅड्स देखील आहेत.

मुकेश अंबानी BMW760Li या गाडीमध्ये प्रवास करीत असून, ह्या गाडीची किमात तब्बल ८ कोटी ५० लाख रुपये इतकी आहे. ही गाडी बुलेटप्रूफ असून, या गाडीमध्ये कॉन्फरंस सेंटर, आणि टीव्ही स्क्रीन इत्यादी सोयी आहेत. मुकेश अंबानी यांच्याकडे स्वतःचे खासगी एअरबस – ३१९ जेट विमान असून, या जेट ची किंमत २४२ कोटी रुपये आहे. हे जेट मुकेश यांनी आपली पत्नी नीता यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून दिले होते. या विमानामध्ये ऑफिस केबिन, उत्तम प्रतीची म्युझिक सिस्टम, सॅटेलाईट टीव्ही आणि वायरलेस कम्युनिकेशन इत्यादी सोयी आहेत. या विमानामध्ये पाहुण्यांना आराम करता यावा या करिता आधुनिक सुखसोयींनी परिपूर्ण असे शयनकक्षही आहेत.

या एअरबसच्या जोडीला मुकेश अंबानी यांच्याकडे बिझिनेस जेट -२, आणि फाल्कन 900 ईएक्स ही विमाने देखील आहेत. यामध्ये मुकेश यांचे बिझिनेस ऑफिस, बोर्डरूम, आणि खासगी शयनकक्ष आहे. बिझिनेस जेटची किंमत ७३ मिलियन डॉलर्स असून, फाल्कन 900 ईएक्स विमानाची किंमत ४३.३ मिलियन डॉलर्स आहे.

Leave a Comment