जाणून घ्या देशातील मोठ्या उद्योगपतींच्या मुलांची कमाई


आपल्या देशात अनेक उद्योगपती घराणी असून नेहमीच त्यांच्याबद्दल चर्चा होत असते. अनेकांना इंटरेस्ट असतो ते किती क्रमांकाचे श्रीमंत आहेत? त्यांच्याकडे किती संपत्ती आहे? हे जाणून घेण्याचे. त्यांच्या मुलांच्याही त्यांच्यासोबत चर्चा होतच असतात.

मुकेश अंबानी यांचे नाव भारतातील एक मोठे उद्योगपती म्हणून घेतले जाते. मुकेश अंबानीचा मुलगा आकाश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानी यांचे सॅलरी पॅकेज अजून ठरले नाही. रिलायंस ग्रुपच्या टेलिकॉम आणि रिटेल व्हेंचर्समध्ये सध्या ते दोघेही महत्वाची भूमिका निभावत आहेत. ईशा अंबानी ही नुकत्याच लॉन्च केलेल्या रिलायंस जिओचे संपूर्ण काम बघते आहे.

अदानी पोर्ट्स अ‍ॅन्ड स्पेशल इकॉनॉमिक्स झोन लिमिटेडचा सीईओ म्हणून गुजराती उद्योगपती गौतम अदानीचा मुलगा करनला नेमले गेले आहे. करनसाठी बोर्डने वार्षिक १.५ कोटीचे पॅकेज ठरवले आहे. यात पगार आणि दुसरे भत्तेही सामिल आहेत.

रिलायन्स ग्रुपच्या फायनॅन्शिअल सर्व्हिस आर्म रिलायंस कॅपिटलमध्ये डिरेक्टर ऑन बोर्ड म्हणून अनिल अंबानीचा मुलगा अनमोल अंबानी याला निवडले गेले. त्याचा कंपनीत पगार १० लाख रूपये दर महिना ठरला आहे. त्याला वार्षिक १.२ कोटी रूपये मिळतील. एजीएममध्ये अनेक प्रपोजल ठेवण्यात आले त्यात अनमोल याला ५ वर्षांपर्यंत एक्झिक्युटीव्ह डिरेक्टर बनवले जावे.

टिव्हीएस कंपनीत जॉईंट मॅनेजिंग डिरेक्टर म्हणूण टिव्हीएस मोटर्सचे वेणु श्रीनिवासन यांचा मुलगा सुदर्शन वेणुने जॉईन केले आहे. २०१५-१६ वर्षासाठी कंपनीने सुदर्शन याला वार्षिक ९.५९ कोटी रूपये एवढे पॅकेज दिले होते. कंपनी आता त्याचे पॅकेज वाढवू शकते.

Leave a Comment