मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करताय? सावधान !


सध्याच्या काळामध्ये अन्न गरम करण्याकरिता बहुतेक स्वयंपाकघरांमध्ये मायक्रोवेव्हचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. आणि वाढणार का नाही ? मायक्रोवेव्ह सारखे कमालीचे उतपादन आपल्या मदतीला असताना अन्न झटपट गरम होते, वेळ वाचतो आणि गॅसची ही बचत होते. शिवाय गरम होत असलेल्या अन्नावर लक्ष ठेवावे लागत नाही. मायक्रोवेव्ह मध्ये वेळ सेट केली की मायक्रोवेव्ह आपले काम पूर्ण करून आपोआप बंदही होऊन जातो. अगदी भाज्या तयार करण्यापासून ते टीव्हीवर सिनेमा बघताना तोंडात टाकण्यासाठी पॉपकॉर्न पर्यंत सर्व काही मायक्रोवेव्ह मध्ये अगदी काही सेकंदांच्या अवधीत तयार होते. पण स्विस शास्त्रज्ञ हान्स हार्टल यांनी केलेल्या संशोधनानुसार मायक्रोवेव्ह मध्ये अन्न गरम केल्याने त्यामधील पोषक तत्वे नष्ट होतात. मायक्रोवेव्ह मध्ये तीव्र रेडीयेशनच्या मदतीने अन्न गरम केले जात असल्याने अन्नामधील रासायनिक आणि आण्विक संबंध नष्ट होऊन त्यांच्या जागी घातक रेडियोअॅक्टीव्ह कंपाऊंड अन्नामध्ये तयार होतात.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार मायक्रोवेव्ह मध्ये गरम केलेल्या अन्नाचे सतत सेवन करण्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे शरीरामध्ये वारंवार कसले न कसले विकार, इन्फेक्शन उद्भवू लागतात. त्यामुळे अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करायचाच असेल, तर त्यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम हे लक्षात घ्या, की अन्न कमी काळाकरिता मायक्रोवेव्ह मध्ये गरम करा, पण अन्न पूर्णपणे मायक्रोवेव्ह मध्ये शिजवू नका. तसेह अन्न गरम करीत असताना अधून मधून चमच्याने ढवळा. या मुळे उष्णता सर्व अन्नामध्ये एकसारखी विभागली जाईल.

मायक्रोवेव्ह मध्ये अन्न गरम करण्याकरिता शक्यतो काचेची भांडी वापरा. पुष्कळ लोक मायक्रोवेव्ह साठी प्लास्टिकची भांडी वापरतात. पण सर्वच प्लास्टिक मायक्रोवेव्ह मध्ये वापरणे योग्य नाही. हलक्या प्रतीच्या प्लास्टिकच्या भांड्यामध्ये अन्न ठेऊन ते मायक्रोवेव्ह मध्ये गरम करणे धोकादायक ठरू शकते. मायक्रोवेव्ह मध्ये वापरण्यासाठी खास प्रकारच्या प्लास्टिक च्या भांड्यांचा वापर करा. अश्या भांड्यांवर, ती ‘ मायक्रोवेव्ह सेफ ‘ असल्याबद्दलची सूचना असते. तसेच काचेची भांडी वापरताना त्यावर कोणत्याही प्रकारची सोनेरी, चंदेरी नक्षी असेल, तर ती भांडी वापरू नयेत.

प्रत्येक अन्नपदार्थ किती गरम करायचा या बद्दलच्या सविस्तर सूचना प्रत्येक मायक्रोवेव्हच्या ‘ युजर मॅन्युअल ‘ मध्ये दिलेल्या असतात. तय सूचनांचे पालन करावे. एखादा द्रव पदार्थ मायक्रोवेव्ह मध्ये गरम करताना त्यावर लक्ष ठेवावे. ठराविक वेळेपेक्षा तो पदार्थ जास्त गरम करू नये. तसेच चहा, कॉफी, दूध गरम करताना मायक्रोवेव्ह सेफ भांड्यांचा किंवा कपांचा वापर करा. कित्येकदा कप मायक्रोवेव्ह सेफ नसूनही त्याचा वापर मायक्रोवेव्ह मध्ये केल्याने कपाचा स्फोट होऊन अपघात झालेले आहेत. त्यामुळे त्या बाबतीत काळजी घेणे अगत्याचे आहे.

Leave a Comment