खेकड्याच्या आकाराची इमारत बनत आहे चीनमध्ये


बिजिंग : तुम्ही आजवर वेगवेगळ्या आकारांच्या इमारती बनल्या असल्याचे पाहिले किंवा ऐकले असेल. पण, एखाद्या प्राण्याच्या आकाराची इमारत तुम्ही कधी पाहिली आहे का? पण अशीच एक इमारत चीनमध्ये तयार होत असून चक्क खेकड्याच्या आकाराची ही इमारत आहे.

याबाबत सिन्हुआ या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ही इमारत चीनमध्ये तयार होत असून यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात येत आहे. तीन मजल्याची ही इमारत असून त्याची लांबी ७५ मीटर आणि रुंदी १६ मीटर आहे. सोशल मीडियात या इमारतीचे फोटोज खूपच शेअर केले जात आहेत. अनेकांनी तर ही एक क्रिएटीव्हीटी असल्याचे म्हटले आहे.

याबाबत माहिती देताना बेक्सीयुआन मॅनेजमेंट कंपनीचे जनरल मॅनेजर झाओ जियानलिन यांनी सांगितले की, एक व्यावसायिक स्वरुपात या इमारतीचा उपयोग करण्यात येणार आहे. मनोरंजन, रेस्टॉरंट आणि स्टोअर्सचा यामध्ये समावेश असणार आहे. यावर्षीच्या मार्च महिन्यात या इमारतीचं बांधकाम सुरु झाले असून हे बांधकाम येत्या वर्षात पूर्ण होणार असल्याचा अंदाज आहे असे झाओ जियानलिन यांनी सांगितले आहे. ही इमारत क्रॅब कल्चर आणि बाकेंग शहरांचा इतिहास दर्शवण्यास मदत करु शकते असेही झाओ यांनी सांगितले. एका तलावाच्या शेजारी बाकेंग शहर हे वसलेले आहे. यांगचेंग तलावात प्रत्येक वर्षी २,००० टनाहून अधिक खेकडे या ठिकाणी पकडले जातात.

Leave a Comment