तुम्हाला माहित आहेत राष्ट्रगीताबद्दलच्या या गोष्टी ?


आपल्या राष्ट्रगीताबद्दल अनेक मनोरंजक तथ्ये आहेत, त्याबद्दल जाणून घेऊन आपले ज्ञान नक्की वाढेल. हे कोणी लिहिले आहे, ते किती वेळ गायले जाते आणि त्याचे महत्त्व काय आहे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये एक कविता लिहिली, ती 5 ओळींची होती.
  • या कवितेचा पहिला श्लोक राष्ट्रगीतात घेण्यात आला आहे.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या गीताचे हिंदीत आणि कॅप्टन आबिद अली यांनी त्याचे उर्दूत भाषांतर केले.
  • जन-गण-मन बंगाली भाषेत लिहिलेले आहे, ज्यात संस्कृत शब्दाचा समावेश आहे.
  • 27 डिसेंबर 1911 रोजी प्रथमच कॉंग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात हे गीत गायले गेले.
  • 24 जानेवारी 1950 रोजी हे गीत अधिकृतपणे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले.
  • आंध्र प्रदेशातील मदनपल्ली येथे स्वत: रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीताचे बोल व धून तयार केली.
  • बेसेन्ट थिओसॉफिकल सोसायटीचे प्राचार्य आणि कवी जेम्स एच. कुसिन यांची पत्नी मार्गारेट यांनी राष्ट्रगीताच्या इंग्रजी
  • अनुवादासाठी संगीताचे संकेत तयार केले होते.
  • कायद्यानुसार कोणालाही राष्ट्रगीत गाण्याची सक्ती करता येणार नाही. एखादी व्यक्ती राष्ट्रगीत गाताना किंवा वाजवताना
  • शांततेत उभी राहिली तर ती राष्ट्रगीत किंवा राष्ट्राचा अपमान मानली जात नाही.
  • राष्ट्रगीत गायला 52 सेकंद लागतात.
  • याचे संक्षिप्त रुप (प्रथम आणि शेवटची ओळ) गायला 20 सेकंद लागतात.
  • राष्ट्रगीताच्या नियमांचे पालन न करणाऱ्या आणि राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध प्रिव्हेंशन ऑफ इनसल्‍ट टू
  • नॅशनल ऑनर अॅक्‍ट- 1971 च्या कलम 3 नुसार कारवाई केली जाते.
  • भारत सरकारच्या सूचनेनुसार, चित्रपटांच्या सुरुवातीला किंवा चित्रपटाच्या कोणत्याही दृश्यात राष्ट्रगीत वाजवले गेले तर उभे राहणे किंवा गाणे आवश्यक नाही.
  • असे म्हटले जाते की टागोर यांनी हे गीत इंग्रज जॉर्ज पंचमच्या कौतुकात लिहिले होते. 1939मध्ये लिहिलेल्या पत्रात टागोर यांनी हे नाकारले होते.

Leave a Comment