ओवेसींच्या बाप-जाद्या मुघलांनी भारत आणि भारतीयांसाठी काय केले – वसीम रिझवी


लखनऊ – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी हल्लाबोल केला आहे. मुघलांनी भारतावर 800 वर्षे राज्य केल्याचे वक्तव्य ओवेसी यांनी केले होते. यावर मुघल बादशाह नाही लुटारू होते, असे रिझवी यांनी म्हटले आहे. मंदिरे पाडून त्यांची तोडफोड करून मुघलांनी जामा मशिदी बांधल्याचेही ते म्हणाले.

ओवेसी म्हणले होते की, मुघल आणि औरंगजेब त्यांचे बाप-जादे होते. आपल्या बाप-जाद्यांनी हिंदुस्तानावर 800 वर्षे सत्ता गाजवल्याचे या मुघलांच्या अवलादी सांगताहेत. पण, मुघल येथील बादशाह किंवा राजे नव्हते. ते परदेशातून आलेले लुटारू होते. त्यांनी येथील लोकांना कैदी बनवून त्यांच्यावर जुलूम, अत्याचार केल्याचे रिझवी म्हणाले.

ओवेसी म्हणाले होते की, मुघलांनी भारताला चार मीनार, लाल किल्ला बांधून दिला. पण प्रत्यक्षात त्यांनी येथील मंदिरे पाडून त्यांची तोडफोड करून जामा मशिदी बांधल्या आहेत. ओवेसींच्या बाप-जाद्यांनी त्यांच्या प्रेयसींसाठी ताजमहाल बांधल्याचेही रिझवी पुढे म्हणाले. भारत आणि भारतीयांसाठी ओवेसींच्या बाप-जाद्यांनी मुघलांनी काय केले, असा सवाल रिझवी यांनी केला.

केवळ 800 वर्षे जुना भारताचा इतिहास नसून तो हजारो वर्षे जुना आहे. ही धरती रामाची आहे, रामाचा देश आहे, रामाचा हिंदूस्तान आहे. अयोध्या, काशी, मथुरा, हरिद्वार प्रत्येक ठिकाणी आजही मशिदी दिसतात. तेथे मुस्लिमांना येण्या-जाण्यास अटकाव केलेला नाही. ही हिंदूंची उदारमतवादी विचारसरणी असल्याचे, असे ते म्हणाले.

पण, मक्केला जाण्याची कुठल्या हिंदूला परवानगी आहे का? मक्केमध्ये कुठले मंदिर बांधले जाऊ शकते का? हा मुस्लीम कट्टरपंथियांचा खरा चेहरा असल्यामुळे संपूर्ण जग कट्टरतावादी इस्लामी विचारसणीमुळे दहशतीखाली असल्याचे म्हणत त्यांनी अकबरुद्दीन ओवेसींवर सडकून टीका केली.

भारतात 800 वर्षे मुघलांची सत्ता होती, असे वक्तव्य अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले होते. अरे आठशे वर्षे मी या देशावर सत्ता गाजवली आहे. हा माझा देश आहे. माझा होता आणि माझाच राहील. आबा-ओ-अजदाद (माझ्या बाप-जाद्यांनी) या देशाला चारमिनार दिला. मक्का मशीद दिली. जामा मशीद दिली. कुतुबमिनार दिला. अरे, भारताचे पंतप्रधान (हिंदुस्तान का वजीर-ए-आजम) ज्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकवतात, तोही माझ्या आबा-ओ-अजदाद यांनी बांधला आहे. जर कोणी कागदावरील पुरावे मागत असेल तर, त्यांनी चारमीनार पाहावा. तो सर्वांत मोठा पुरावा आहे. तो माझ्या बाप-जाद्यांनी तयार केला आहे. तुझ्या बापाने बांधलेला नाही, असे अकबरुद्दीन यांनी म्हटले होते.

Leave a Comment