उद्धव ठाकरे ७ मार्चला जाणार अयोध्येला – संजय राऊत


मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ७ मार्चला अयोध्येला जाणार असल्याची माहिती दिली. ते रामलल्लाचे तेथे दर्शन घेऊन, शरयू आरतीही करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. त्याचबरोबर आमच्यासाठी राम मंदिराचा मुद्दा श्रद्धेचा विषय असल्याचे राऊत म्हणाले.

राम मंदिराच्या मुद्यावरुन राजकारण होऊ नये, राजकीय दृष्टीने कोणी पाहू नये, असे राऊत म्हणाले. अयोध्येला जाताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींनाही घेऊन जावे असे भाजपने म्हटले होते, यावर संजय राऊत म्हणाले की, भाजप मेहबूब मुफ्तिला घेऊन जाणार होते का? असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिरासंदर्भात सर्वाच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले होते. हे भाजपच्या नजरेतून सुटल्याचे राऊत म्हणाले. भाजपच्या प्रत्येक वक्तव्यावर उत्तर देण्याची गरज नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

Leave a Comment