प्रजासत्ताक दिनासाठी ट्विटरने सादर केला खास इमोजी

71व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ट्विटरने खास ट्राय कलर असलेले इंडिया गेटचे इमोजी सादर केले आहे. देशभरात 26 जानेवारी 2020 ला उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. इंडिया गेटला केसरी, पांढरा आणि हिरव्या रंगात रंगवण्यात आले आहे. #RepublicDay, #RepublicDayIndia आणि #RDay71 हे हॅशटॅग वापरल्यानंतर हा इमोजी दिसतो.

Image Credited – Indianexpress

आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशाला संबोधित करताना त्यांचे अधिकृत ट्विटर हँडल @rashtrapatibhvn वरून ही इमोजी वापरून ट्विट केले जाईल.

Image Credited – India Today

ट्विटरचे प्रजासत्ताक दिनाचा हा खास इमोजी आधीच सादर केला गेला आहे. इंग्रजी व्यतरिक्त युजर्सनी हिंदी, बंगाली, उर्दू, तमिळ, गुजराती, गुरुमुखी, कन्नड, मल्याळम आणि मराठीसह 10 दुसऱ्या भाषांमध्ये ट्विट केल्यावरही हे इमोजी दिसेल. उदाहरणार्थ #गणतंत्रदिवस वापरून ट्विट केल्यावरही इमोजी दिसेल.

दरवर्षी ट्विटर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे इमोजी सादर केले जाते.

Leave a Comment