आयकर विभागाच्या नव्या नियमाचे पालन केले तर कंपनी कापू शकते तुमचा पगार


मुंबई – जर आपण नोकरदार असला आणि 2.5 लाख रुपये एवढी वेतनाद्वारे मिळणारे आपली वार्षिक कमाई असेल तर आयकर विभागाच्या नव्या नियमांबाद्दल लगेच माहिती घ्या. कारण तुम्ही काम करत असलेल्या कंपनीत जर तुम्ही आधार आणि पॅन कार्ड क्रमांक जमा केले नसेल तर आपल्यासमोर मोठीच समस्या निर्माण होऊ शकते. नुकताच एक नवा नियम आयकर विभागाने लागू केल्याचे वृत्त असून त्यानुसार एखाद्या कर्मचाऱ्याने जर आपल्या कंपनीकडे आपला आधार आणि पॅन कार्ड क्रमांक उपलब्ध करुन दिला नाही. तर संबधित कर्मचाऱ्याच्या पगारातून तब्बल 20 टक्के टीडीएस कापला जाऊ शकतो.

याबाबत इतर प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) द्वारा हा नवा नियम बनविण्यात आला आहे. येत्या 16 जानेवारीपासून जो लागू करण्यात आला आहे. हा नियम त्या लोकांना लागू असेल ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असेल. असे सांगितले जात आहे की, हा नियम यासाठी बनविण्यात आला आहे की, जेणेकरुन टीडीएस वेतनावर नजर ठेवता येऊ शकेल. सोबतच सेग्मेंट रेव्येन्यूही वाढवला जाईल. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये किमान डायरेक्ट टॅक्स कलेक्शनच्या 37 टक्के हिस्सा या सेग्मेंटमध्ये आला होता.

सीबीडीटीने यासाठी 86 पानांचे एक सर्क्युलरही जारी केले आहे. ज्यात कर्मचाऱ्यांना इनकम टॅक्स अॅक्ट सेक्शन 206-AA अन्वये आपल्या कंपनीला आधार आणि पॅन क्रमांक देने अनिवार्य आहे. सर्क्युलरमध्ये असेही म्हटले आहे की, जर एखाद्या कर्मचाऱ्याने ही माहिती कंपनीकडे जमा केली नाही तर, कंपनी त्याच्या वार्षिक पगारातून कर रुपात 20 टक्के वेतन कापू शकते.

आपली वार्षिक कमाई जर 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर आपल्या वेतनात कोणत्याही प्रकारे कपात केली जाणार नाही. सर्व प्रकारची कपात झाल्यानंतर आपल्या पगारात 20 टक्के कर लागत असेल तर 20 टक्के डीडीएस अप्लाई होऊ शकेल. जर आपल्या पगारावर अशा प्रकारे 30 टक्के टॅक्स लागत असेल तर कंपनी आपल्या पगाराती अंशत: रक्कम कररुपाने कापू शकते. हा अंशत: कर आपल्या किमान टॅक्स लायबिलिटीपेखा किमान वार्षिक उत्पन्नाला भागून काढला जाईल. दरम्यान, जर कर्मचाऱ्याला अधिक कर द्यावा लागत असेल तर त्याला 4 प्रकारची एज्युकेशन आणि हेल्थ यांसारखी सेस सवलत दिली जाऊ शकते. सीबीडीटीने असे देखील म्हटले आहे की, पॅन आणि आधार कार्ड नसल्याने क्रेडिट जारी करण्यात अडचण येत असल्यामुळे करकपात करणाऱ्यांना सल्ला दिला जातो की, टीडीएस स्टेटमेंटमध्ये आधार आणि पॅन क्रमांकाची माहिती द्या.

Leave a Comment