कंगनाच्या ‘पंगा’वर भारी पडला ‘स्ट्रीट डान्सर’


काल म्हणजेच २४ जानेवारीला रेमो डिसूजा दिग्दर्शित ‘स्ट्रीट डान्सर’ आणि अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित ‘पंगा’ हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिरवर रिलीज झाले. आपल्या चित्रपटांचे दोन्हीही चित्रपटांच्या टीमने दमदार प्रमोशन केले होते. सोशल मीडियावर या चित्रपटांच्या ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चांगलीच शर्यत पाहायला मिळाली.


या दोन्ही चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईच्या आकड्यांबाबतची चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी माहिती दिली आहे. यामध्ये कंगना राणावतच्या ‘पंगा’ चित्रपटाच्या तुलनेत ‘स्ट्रीट डान्सर’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.


पहिल्याच दिवशी श्रद्धा कपूर आणि वरुण धवन यांचा मल्टीस्टारर असलेल्या ‘स्ट्रीट डान्सर’ चित्रपटाने १०.२६ कोटीची कमाई केली आहे. तर, ‘पंगा’ चित्रपटाची कमाई फक्त २.७० कोटी एवढी झाली आहे. या आकड्यांमध्ये आठवड्याच्या शेवटपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचीही दोन्ही चित्रपटांना प्रशंसा मिळत आहे. पण तिकिट बारीवर यापैकी कोणता चित्रपट बाजी मारेल, हे आगामी काही दिवसातच स्पष्ट होईल.

Leave a Comment