8.2 कोटींची रॉल्स रॉयसची लग्झरी कार भारतात लाँच

लग्झरी कार कंपनी रोल्स रॉयसने भारतात आपली नवीन कलिनन ब्लॅक बॅझ कार भारतात लाँच केली आहे. या लग्झरी कारची किंमत 8.2 कोटी रुपये आहे. ब्लॅक बॅझने 2016 मध्ये रॅथ आणि घोस्टसह पदार्पण केले होते. तर 2017 मध्ये कंपनीने डॉन लाँच केली होती. याच मॉडेलप्रमाणे कलिनन ब्लकॅ बॅझमध्ये ब्लॅक पेंट शेडचा वापर केला आहे. या लग्झरी कारमध्ये ग्राहकांना 44,000 पेंट स्कीम पर्याय मिळेल.

कारच्या एक्सटेरिअरमध्ये ग्लॉस ब्लॅक क्रोम हायलाइटेड फिनिश देण्यात आले आहे. जसे फ्रंट ग्रिल सराउंड, साइड फ्रेम फिनिशर्स, बूट हँडल, बूट ट्रिम, लोअर एअर इनलेट फिनिशर आणि एग्झॉस्ट पाइपवर पाहिला मिळेल. या लग्झरी कारमध्ये 22 इंच एलॉय व्हिल देण्यात आलेले आहे. ब्रेक कॅलिपर्सवर हाय ग्लास रेड पेंटचा वापर करण्यात आलेला आहे.

Image Credited – NDTV

कारचे इंटेरिअर देखील शानदार आहे. कारच्या इंटेरिअरमध्ये अपोहल्सट्री रंग, फॅब्रिक मटेरियल वापरण्यात आले आहे. कारमध्ये मॅजिक रुफ थीम देण्यात आलेली आहे. हे सर्व फीचर्स ग्राहक स्वतःच्या आवडीनुसार, पर्सनलाइज करतात. रिअर पॅसेंजर्ससाठी हाय डेफिनेशन 12 इंच टचस्क्रीन फ्रंट सीट्सच्या पाठीमागे देण्यात आले आहे.

Image Credited – Forbes

कारमध्ये ब्लू रे प्लेयर आणि डिजिटल टेलिव्हिजन सोबत 18 स्पीकर देण्यात आलेले आहेत. यासोबतच कारमध्ये नाइट व्हिजन फंक्शन, पडेस्ट्रियन आणि वाइडलाइफ अलर्ट, अलर्टनेस असिस्टेंट, पॅरानॉमिक व्यूसोबत 4 कॅमेरे, एक्टिव क्रूज कंट्रोल, वाय-फाय हॉटस्पॉट आणि हेड अप डिस्प्ले सारखे जबरदस्त फीचर्स मिळतील.

Image credited – Rolls Royce

ब्लॅक बॅझ किननमध्ये 6.75 लीटर ट्विन टर्बोचार्ज्ड व्ही12 मोटार देण्यात आली आहे. जे 592 बीएचपी पॉवर आणि 900 एनएम टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 8 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे.

Leave a Comment