या तिकीट चेकरने एका वर्षात वसूल केला विक्रमी दंड

रेल्वेत प्रवास करताना तिकीट न काढल्यास तिकीट चेकर अशा प्रवाशांकडून दंड वसूल करतात. मात्र एका तिकीट चेकरने मागील वर्षी प्रवाशांकडून एवढा दंड वसूल केला आहे की तुम्ही रक्कम वाचून थक्क व्हाल. ट्रॅव्हलिंग तिकीट इंस्पेक्टर एसबी गलांडे यांनी 2019 मध्ये 22680 विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल 1.51 कोटी रुपये वसूल केले आहेत. व्यक्तीगत स्वरुपात वसूल केलेला हा सर्वाधिक दंड आहे. ते सेंट्रल रेल्वे (सीआर) फ्लाइंग स्क्वाडमध्ये कार्यरत आहेत.

गलांडे यांच्यासह अन्य तीन तिकीट चेकरने देखील विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 2019 मध्ये 1 कोटींपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे. यामध्ये एमएम शिंदे यांनी 16,035 प्रवाशांकडून 1.07 कोटी रुपये, डी कुमार यांनी 15,265 प्रवाशांकडून 1.02 कोटी रुपये आणि मुंबई डिव्हिजनचे चीफ तिकिट इंस्पेक्टर रवि कुमार यांचा समावेश आहे.

भारतात तिकीट चेकर्सला अवघड परिस्थितीमध्ये काम करावे लागते. अनेकदा प्रवाशांबरोबर भांडण झाल्याच्या घटना देखील समोर येत असतात.

सेंट्रल रेल्वने 2019 मध्ये 37.64 लाख विना तिकीट प्रवास  आणि अनियमित ट्रॅव्हल एजेंटकडून 192.51 कोटी रुपये दंड वसूल केला आहे. तर 2018 मध्ये 34.09 लाख जणांकडून 168.30 कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

Leave a Comment