अवघ्या 1 मिनिटात इंटरनेटवर घडतात या गोष्टी

एका मिनिटात तुम्ही काय करू शकता असे तुम्हाला कोणी विचारले तर ? तुमचे उत्तर असेल एखाद्याला 10 मेसेज पाठवेल किंवा 100 मीटर धावू शकतो. मात्र विचार करा एकाचवेळी लाखो लोकांनी हे काम सोबत केले तर ? विचार करा 1 मिनिटात इंटरनेटवर काय काय घडू शकते.

Image Credited – Amar ujala

व्हॉट्सअ‍ॅप – 

एका मिनिटात व्हॉट्सअ‍ॅपवर तब्बल 4.1 कोटी मेसेज पाठवले जातात. व्हॉट्सअ‍ॅपचा सर्वाधिक वापर नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी केला जातो. रिपोर्टनुसार, नवीन वर्ष 2020 च्या आदल्या दिवशी जगभरात तब्बल 100 अब्ज व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवण्यात आले. यातील 20 अब्ज मेसेज हे भारतीयांनी केलेले आहेत.

Image Credited – Amar ujala

युट्यूब –

युट्यूबवर एका मिनिटात तब्बल 45 लाख व्हिडीओ पाहिले जातात. आजही गाणी ऐकण्यासाठी सर्वाधिक वापर युट्यूबचा होता.

Image Credited – Amar ujala

गुगल –

सर्च इंजिनचा बादशाह असलेल्या गुगलवर एका मिनिटात 38 लाख सर्च केले जाते.

Image Credited – Gadgets Now

फेसबुक –

फेसबुकवर 1 मिनिटाला तब्बल 10 लाख लोक लॉगइन करतात.

Image Credited – Amar ujala

इंस्टाग्राम –

1 मिनिटात इंस्टाग्रामवर 2,77,777 फोटो अपलोड केले जातात.

Image Credited – Amar ujala

अ‍ॅप स्टोर –

गुगल प्ले आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोरवरून एका मिनिटाला 3,90,000 अ‍ॅप डाउनलोड होतात.

Image Credited – TechCrunch

ट्विटर –

ट्विटरवर एका मिनिटात तब्बल 5,11,200 ट्विट केले जातात. सर्वाधिक ट्विट हे सामाजिक मुद्यावर केले जातात.

 

Image Credited – The Verge

नेटफ्लिक्स –

प्रत्येक मिनिटाला नेटफ्लिक्सवर एकूण 6,94,444 तासांचे व्हिडीओ पाहिले जातात. 2016 मध्ये भारतात लाँच झाल्यानंतर नेटफ्लिक्सची लोकप्रियता वाढली आहे.

Image Credited – Amar ujala

ऑनलाईन शॉपिंग –

1 मिनिटात ऑनलाईन शॉपिंगवर लोक तब्बल 10 अब्ज रुपये खर्च करतात. या ऑनलाईन शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ईबे आहेत.

Image Credited – Amar ujala

Giphy फाइल –

जिफीवर 1 मिनिटात 48 लाख जिफ फाइल बनवल्या जातात. व्हॉट्सअ‍ॅपवर जिफीचा सपोर्ट आल्यानंतर जिफी अधिकच लोकप्रिय झाले आहे.

Leave a Comment