बीएस6 इंजिनसह लाँच झाली शानदार मारुती ‘सिआझ एस’

कार कंपनी मारुती सुझुकीने आपली मिडसाइज सेडान कार मारुती सिआझला नवीन बीएस6 इंजिनसह लाँच केले आहे. कंपनीने या कारला सीआझ एस म्हणजेच स्पोर्ट्स नाव दिले आहे.

Image Credited – NDTV

मारुती सिआझचे हे स्पोर्टी व्हर्जन आहे. यामध्ये मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. या कारला संगारिया रेड, पर्ल स्नो व्हाइट आणि प्रिमियम सिल्वर रंगात लाँच करण्यात आले आहे.

Image Credited – NDTV

या व्हर्जनमध्ये सिग्नेचर ड्युअल-टोन स्पोर्टी एक्सटेरियर आणि मागील व बाजूला काळ्या रंगाचे बॉडी स्पायलर्स, ट्रंक लिड स्पॉयलर, ओआरव्हीएम कव्हर आणि फ्रंट फॉग लॅम्प गार्निश मिळेल. यात 16 इंचचे एलॉय व्हिल मिळतील. या कारची कॅबिन पुर्ण ब्लॅक थीममध्ये मिळतील.

Image Credited – The Statesman

मारुती सिआझ एसमध्ये बीएस6 मानक 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार SHVS माइल्ड हाइब्रिड टेक्नोलॉजीसोबत येते. जे 103.5 बीचपी पॉवर आणि 138 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 4 स्पीड टॉर्क कन्वर्टरसोबत येते. या कारच्या व्हेरिएंटची किंमत 8.31 लाख रुपये ते 10.08 लाख रुपये आहे.

Leave a Comment