संविधानाच्या सुरूवातीच्या प्रती छापणाऱ्या मशीन्सची भंगारात विक्री

26 जानेवारी 2020 ला भारत आपला 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. भारताच्या संविधानाला देखील 70 वर्ष झाली आहे. मात्र याच संविधानाच्या सुरूवातीच्या प्रती छापणाऱ्या दोन लिथोग्राफ मशीन्सला भंगाराच्या भावात विकण्यात आले आहे. सर्वे ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की दोन्ही मशीन्सला खोलून मागील वर्षीच स्क्रॅप डिलरला (भंगार विक्रेता) जवळपास दीड लाख रुपयांना विकण्यात आले आहे. याबाबतची माहिती आता समोर आली आहे. सॉव्रिन आणि मोनार्क नावाच्या या दोन्ही प्रिटिंग मॉडेलच्या मशीन्सची निर्मिती क्रॅबटी कंपनीने केली होती.

भारतीय संविधानाच्या सुरूवातीच्या 1 हजार प्रतींचे प्रकाशन 1955 मध्ये देहरादूनच्या सर्वे ऑफ इंडियाने केले होते. याची एक प्रत आजही त्यांच्याकडे आहे. बाकी सर्व प्रती दिल्लीला पाठवण्यात आल्या होत्या. कॅलीग्राफी आर्टिस्ट प्रेम बिहारी रायजादा यांनी इंग्रजी आणि वसंत कृष्ण वैद्य यांनी हिंदीच्या संविधान प्रतीवर काम केले होते. याच्या पानांचे डिझाईन नंदलाल बोस, बेहोर राममनोहर सिन्हा आणि शांति निकेतनच्या अन्य कलाकारांनी केले होते.

सर्व ऑफ इंडियाचे निवृत्त लेफ्टिनेंट जनरल गिरीश कुमार यांच्यानुसार, लिथोग्रॅफिक मशीन खूप जुन्या होत्या. त्यांची काळजी घेणे खर्चिक होते. या मशीनचा वापर प्रिंटिंगसाठी होत नसल्याने, त्यांना विकणेच योग्य होते. सर्वे ऑफ इंडियाला 252 वर्ष झाले आहेत. एवढ्या वर्षात आमच्याकडे अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत. आम्ही देखील त्यांच्याशी जोडलेले आहोत, मात्र वेळेसोबत चालणे आणि पुढे जाणे यातच समजुतदारपणा आहे. मशीन्सचे प्रतिरूप एखाद्या संग्रहालयात ठेवण्याचा विचार होऊ शकतो.

Leave a Comment