भारतात लवकरच लाँच होणार पहिला 5जी स्मार्टफोन

भारतात लवकरच 5जी स्मार्टफोन लाँच होणार आहे. चीनची स्मार्टफोन कंपनी  iQOO भारतात पहिला 5जी स्मार्टफोन पुढील महिन्यात लाँच होणार आहे. कंपनी भारतात iQOO प्रो आणि iQOO प्रो 5जी स्मार्टफोन  पुढील महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे. याआधी देखील कंपनीने व्हिवोबरोबर मिळून काही स्मार्टफोन भारतात लाँच केलेले आहेत.

कंपनीचे सिनियर एक्झिक्यूटिव्ह गौरव अरोरा यांनी एका मुलाखतीमध्ये कंपनीने भारतात स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे सांगितले आहे.

Image Credited- GSMArena

iQOO आपला पहिला 5जी स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट प्रोसेसरसह लाँच करू शकते. हा भारतीय बाजारात येणारा पहिला 5जी डिव्हाईस असू शकतो. हा फोन फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच होऊ शकतो.

Image Credited – BGR India

या फोनच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर यात 55W चा  व्हिवो सुपर फ्लॅश चार्ज मिळेल. याच्या 4जी व्हेरिएंटबद्दल अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. हा फोन वॉटरड्रॉप नॉच फीचरसोबत येईल. यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेंसर मिळेल. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 + अथवा 730G प्रोसेसर मिळेल.

Leave a Comment