3 कोटींचा हा रोबॉट विझवणार आग

गुजरातमधील अहमदाबाद येथील अग्नीशामक दलाने छोट्याशा गल्लीत आणि रस्त्यावर आग विझवण्यासाठी रोबॉटसोबत टँकर यूनिट खरेदी केला आहे. या रोबॉटची किंमत 3 कोटी रुपये आहे. या रोबॉटचे वैशिष्ट्य म्हणजे हे अन्य डिव्हाईसच्या तुलनेत 200 लीटर क्षमतेने 300 ते 325 पाणी फेकते. पाणी 35 मीटरपर्यंत सरळ जाते व त्यानंतर फवाऱ्याप्रमाणे पसरते. यामुळे पाण्याचा कमी वापर होण्याबरोबरच याची क्षमता 12 पट अधिक आहे.

ऑपरेटर 300 मीटर लांबूनच रोबॉटला नियंत्रित करू शकतो. दीड फूट उंच भिंतीवर देखील रोबॉट वरती चढू शकते. 5 हजार लीटर पाण्याची टाकी, 400 लीटर हायप्रेशर पम्प आणि 500 मीटर लांब पाइप रोबॉटशी जोडलेला आहे.

हा रोबॉट तीन फूटाच्या छोट्याशा गल्लीतून देखील जावू शकतो. यासोबतच अग्नीशामक दलाने 25 लाख रुपयांचा एक ड्रोन खरेदी केला आहे. जो 400 मीटर उंचीवरून थर्मल इमेजद्वारे आग विझवण्यास मदत करेल.

Leave a Comment