विश्वविजेत्या इंग्लड संघाचा भीमपराक्रम - Majha Paper

विश्वविजेत्या इंग्लड संघाचा भीमपराक्रम


नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात २०१९चा विश्वचषक विजेता संघ इंग्लंडने भीमपराक्रम केला आहे. इंग्लड हा कसोटी क्रिकेटमध्ये ५ लाख धावा करणारा पहिला संघ ठरला आहे. इंग्लंडने हा विश्वविक्रम १०२२व्या कसोटी सामन्यात रचला.


सध्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. इंग्लंडच्या जो रूटने या सामन्यात २५ वी धाव घेताच या मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. त्याचबरोबर विदेशात ५०० वा कसोटी सामना खेळणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे. १६ जानेवारीला आफ्रिकेविरूद्ध इंग्लंडने पोर्ट एलिझाबेथ येथे ५०० वा सामना खेळला होता.

त्याचबरोबर सर्वाधिक धावा काढण्याच्या क्रमवारीत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत भारताने ५४० कसोटी सामन्यांमध्ये २,७३,५१८ धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलिया ४,३२,७०६ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी ८३० कसोटी सामन्यात या धावा केल्या आहेत.

Leave a Comment