कोरोना व्हायरसमुळे देशातील पेट्रोल-डिझेल स्वस्त

चीनसह जगभरात कोरोना व्हायरसचा धोका वाढला आहे. भारत सरकारने देखील 96 विमानांच्या 20 हजार प्रवाशांची थर्मल तपासणी केली आहे. मात्र आता या व्हायरसचा परिणाम इंधनावर होताना दिसत आहे.

कोरोना व्हायरसमुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होऊ लागल्या आहेत. चीन हा जगातील कच्च तेलाचा सर्वात मोठा ग्राहक देश आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमधील सार्वजनिक परिवहन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे चीनमधून कच्चा तेलाची मागणी कमी झाली आहे.

चीनमधील कच्चा तेलाची मागणी कमी झाल्याने इंधनाचे भाव कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव जेवढे कमी असतील, तेवढे पेट्रोल व डिझेल स्वस्त होते.

अमेरिका-चीनमधील पहिल्या टप्प्यातील ट्रेड करारानंतर चीनकडून कच्चा तेलाची मागणी वाढण्याची शक्यता होती. मात्र कोरोना व्हायरसमुळे असे झाले नाही.

इंधनाच्या दरात कमी झालेल्या किंमतीमुळे भारतातील ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 11 जानेवारीनंतर दोन आठवड्यात पेट्रोलची किंमत प्रती लीटर 1.85 पैशांनी कमी झाले आहे. तर डिझेलची किंमत प्रती लीटर 1.86 पैशांनी कमी झाली आहे. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलची किंमत देखील कमी झाली आहे.

Leave a Comment