इलेक्ट्रिक स्कूटर ‘बेनलिंग ऑरा’ लाँच, जाणून घ्या किंमत

चीनची इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी बेनलिंग इंडिया एनर्जी अँड टेक्नोलॉजीने भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ऑराला लाँच केले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 99 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

बेनलिंग ऑरामध्ये  2500 BLDC इलेक्ट्रिक मोटार आणि 72V/40Ah डिटॅचेबल लीथियम-आयन बॅटरी देण्यात आलेली आहे. ऑरा सिंगल चार्जिंगमध्ये 120 किमी प्रवास करू शकते. बॅटरी संपुर्ण चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात. स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 60 किलोमीटर आहे.

Image Credited – DriveSpark

ऑरामध्ये रिमोट की सिस्टम देण्यात आले आहे. सोबतच स्कूटरमध्ये यूएसबी चार्जिंग सिस्टम देखील आहे. स्कूटरमध्ये एंटी थेफ्ट अलार्म, एडिशनल रिअर व्हिल इंटिग्रेटेड लॉकिंग सिस्टम आणि रिव्हर्स पार्किंग असिस्टेंट देण्यात आले आहे.

Image Credited – Amarujala

कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर ऑरामध्ये अनेक खास फीचर्स दिले आहेत. यामध्ये ब्रेकडाउन स्मार्ट असिस्टेंस सिस्टम देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की स्कूटरमध्ये काहीही बिघाड झाला तरी या फीचरमुळे स्कूटर पुन्हा चालू होते.

याआधी कंपनीने तीन लो स्पीड मॉडेल कृति, आयकॉन, फाल्कन भारतात सादर केलेले आहेत.

Leave a Comment