लाईव्ह सामन्यात या क्रिकेटपटूची प्रेक्षकाला शिवीगाळ

इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑलराउंडर खेळाडू बेन स्टोक्स पुन्हा एकदा वादात अडकला आहे. स्टोक्सने जोहान्सबर्गमध्ये लाईव्ह सामन्या दरम्यान प्रेक्षकांसाठी अपशब्दांचा वापर केला.

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात स्टोक्स मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला व तो केवळ 2 धावांवर बाद झाला.

बेन स्टोक्स 2 धावांवर बाद झाल्यावर निराश होऊन ड्रेसिंग रुमकडे परतत असताना एक प्रेक्षक बेन स्टोक्सला काहीतरी बोलला. त्या प्रेक्षकाला प्रत्युत्तर देताना स्टोक्सने त्याला शिवीगाळ केला. प्रेक्षक बेन स्टोक्सची तुलना प्रसिद्ध पॉप सिंगर एड शीरनशी केली. त्यावर भडकलेल्या स्टोक्सने चाहत्यासाठी अपशब्द वापरले.

लाईव्ह सामन्यात स्टोक्सचे शब्द स्पष्ट ऐकू आले. यानंतर स्टोक्सने ट्विटरवर आपल्या या वागणुकीसाठी माफी मागितली.

स्टोक्स म्हणाला की, मी आपल्या चुकीच्या भाषेसाठी माफी मागतो, जे लाईव्ह ब्रॉडकास्टवर सर्वांनी ऐकले. जेव्हा मी बाद होऊन परतत असताना प्रेक्षकांकडून माझ्यासाठी अपशब्द वापरण्यात आले. मला माहिती आहे की, मी जे वागले ते अव्यावसायिक आहे व यासाठी मनापासून माफी मागतो.

Leave a Comment