या सिस्टमद्वारे ह्रदयाच्या ठोक्यांनी ओळखता येणार शत्रूराष्ट्राचा गुप्तहेर

अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशन कमांडने (एसओसी) शत्रूराष्ट्राच्या गुप्तहेरांना अथवा एखाद्या संशयित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी एक खास सिस्टम तयार केली आहे.

कॉम्बेटिंग टेरोरिझ्म टेक्निकल सपोर्ट ऑफिसद्वारे विकसित सिस्टम जेटसनद्वारे 200 मीटर अंतरावरील व्यक्तीच्या ह्रदयाच्या ठोक्यांनी त्या व्यक्तीची ओळख पटेल. ह्रदयाचा आकार वेगवेगळा असतो, त्यामुळे ह्रदय धडकण्याचा पॅटर्न देखील वेगळा असतो. जेटसन संबंधित व्यक्तीच्या कपड्यांवर ह्रदयाचे ठोके रेकॉर्ड करेल. सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी आयडियल इनोव्हेशंसने याला हार्टप्रिंट असे नाव दिले आहे.

जेटसन संशयित व्यक्तीच्या ह्रदयाचे ठोके ओळखण्यासाठी वायब्रोमीटर गॅजेटचा उपयोग करते. संबंधित व्यक्तीवर लेझर बीम (प्रकाश) टाकल्याने सुक्ष्म हालचालीची माहिती मिळते. याचा उपयोग गेल्या अनेक वर्षांपासून विमान, जहाजांवरील तोफा आणि विंड टरबाइन सारख्या वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी होत आहे. इंफ्रारेड बीम असल्याने मानवी डोळ्यांनी पाहणे शक्य नाही. व्यक्ती धावत नसताना अथवा चालत्या गाडीत प्रवास करत नसताना हे डिव्हाईस योग्यरित्या काम करते. बीम संशयित व्यक्तीवर जवळपास 30 सेकंद असते.

Leave a Comment