जिओला आव्हान, अवघ्या 1 रुपयात 1 जीबी डेटा देत आहे ही कंपनी

रिलायन्स जिओने काही वर्षांपुर्वी टेलिकॉम क्षेत्रात एंट्री करत इंटरनेट क्रांती सुरू केली होती. जिओ आपल्या स्वस्त प्लॅनसाठी ओळखले जाते. मात्र आता जिओला टक्कर देण्यासाठी आणखी एक कंपनी सज्ज झाली आहे. बंगळुरूची एक कंपनी केवळ 1 रुपयात 1 जीबी डेटा देत आहे. या कंपनीचे नाव वाय-फाय डब्बा (Wifi Dabba) असून, ही कंपनी 2017 पासून सेवा देत आहे.

ही कंपनी आता 1 रुपयात 1 जीबी डेटा देत आहे. 2017 साली ही कंपनी 20 रुपयात 1 जीबी डेटा देत होती. कंपनीजवळ तीन प्लॅन आहेत. यामध्ये 2 रुपयात 1 जीबी डेटा, 10 रुपयात 5 जीबी डेटा आणि 20 रुपयात 10 जीबी डेटा मिळेल. या सर्व प्लॅनचा कालावधी 24 तासांचा आहे. कंपनीच्या डेटा प्लॅनची सरासरी किंमत 1 रुपये प्रती जीबी आहे.

वाय-फाय डब्बा या कंपनीने चहा आणि लोकल दुकानांवर आपले वाय-फाय राउटर इंस्टॉल केले आहे. कंपनीच्या या कॉन्सेप्टचे नाव सुपरनॉड्स आहे. या सुपरनॉड्सद्वारे 20 किलोमीटरपर्यंत 100 जीबी प्रती सेकेंद दराने इंटरनेट सेवा देत आहे. कंपनीने आपल्या राउटरसाठी डब्बा नावाने ऑपरेटिंग सिस्टम देखील तयार केली आहे.

कंपनी आपल्या या प्रोजेक्टला आता अपार्टमेंट आणि सोसाइटीपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने वाय-फायसाठी कोणतीही केबल खरेदी केलेली नाही. तसेच सरकारकडून स्पेक्ट्रम देखील खरेदी केलेले नाही. त्यामुळे कंपनीला केवळ राउटरचा खर्च येत आहे. कंपनीने स्वस्त डेटासाठी स्वतःचे नेटवर्क सिस्टम तयार केले आहे.

Leave a Comment