कोट्यावधीचे घड्याळ आणि लाखोंचे शूज घालून हार्दिकची भटकंती


मागील बऱ्याच महिन्यांपासून टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा क्रिकेटपासून दूर आहे. जरी तो क्रिकेटपासून दूर असला तरी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने आपली गर्लफ्रेंण्ड नताशा स्टाकोविचसोबत साखरपुडा करत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यानंतर तो सध्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. पण सध्या तो चर्चेत येण्यामागे वेगळेच कारण आहे. ते म्हणजे त्याचे लाख मोलाचे शूज आणि कोट्यावधी किंमतीचे घड्याळ.

View this post on Instagram

🐶 ❤️

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on


आपल्या हटके स्टाईल आणि महागड्या कपड्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये हार्दिक पांड्या याची तुलना केली जाते. हार्दिक बऱ्याचवेळा आपल्या महागडे शूज, सनग्लासेस, स्नीकर आणि जॅकेटमध्ये दिसतो. नुकताच पांड्या अशाच लुकमध्ये विमानतळावर दिसून आला.

View this post on Instagram

❤️

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on


मुंबई विमानतळावर नुकताच हार्दिक पांड्या कूल अंदाजात दिसला. पांड्याने यावेळी पाटेक फिलिपचे पर्पेचुअल कॅलेंडर 5740/1G घड्याळ परिधान केले होते, ज्याची सध्याची किंमत 85 लाख असून हे घड्याळ भारतात मिळत नसल्यामुळे त्याची किंमत 1 कोटी 10 लाख आहे.

View this post on Instagram

👑

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on


तर, यावेळी पांड्याने क्रिसचियन लुबाउटिनचे लु स्पाइक्स शूज घातले होते. हे शूज खास ब्लॅक काफफिश लेदरमध्ये तयार केलेले असतात. 70 हजाराच्या घरात यांची किंमत आहे. पण हे शूज आयात केल्यामुळे त्यांची किंमत 1 लाखाच्या घरात जाते. महागड्या कपड्यांसोबतच हार्दिक पांड्या हिऱ्यांचा देखील शौकिन आहे. त्याने विश्वचषक स्पर्धेपूर्वी खास डायमंड बॅट आणि बॉल लॉकेट बनवले होते.

Leave a Comment