आता चक्क ‘कपाटात’ स्वच्छ होणार कपडे

वॉशिंग मशीनमध्ये वारंवार कपडे धुणे व सुखवण्याच्या समस्येपासून आता सुटका होणार आहे. दिग्गज टेक कंपनी सॅमसंगने कपड्यांना स्वच्छ ठेवण्यासाठी एक खास मशीन तयार केली आहे. ही एक हाय-टेक हायड्रेलिक मशीन आहे. जी पाहताना एखाद्या वॉरड्रोब (कपाट) प्रमाणे वाटते. कंपनीने या मशीनला AirDresser नाव दिले असून, याची किंमत 2000 पाउंड (जवळपास 1,87,000 रुपये) आहे. ही मशीन कपड्यांना स्वच्छ करण्यासोबतच कपडे रिफ्रेश आणि सॅनिटाइज देखील करेल.

Image Credited – Navbharattimes

या मशीनमध्ये अगदी सहज कोणतेही कपडे स्वच्छ करता येतील. जर तुम्हाला तुमचे शर्ट अथवा कोट धुवायचे असेल तर यासाठी तुम्हाला केवळ मशीनमध्ये हँगरला लटकावे लागेल. बाकी काम मशीन स्वतः करेल.

कोणत्याही पारंपारिक ड्राय क्लिनिंग मशीनप्रमाणेच हे एअर ड्रायर गरम हवा आणि वाफेच्या मिश्रणाने कपड्यांची सफाई करते. कंपनीचा दावा आहे की मशीन खूप कमी आवाज आणि वायब्रेशनद्वारे काम करते. परिक्षणात समोर आले की, ही मशीन हर्पीज आणि फ्लू सारख्या चार व्हायरसला 99.9 टक्के नष्ट करते.

Image Credited – Navbharattimes

या एअर ड्रायरला वॉशिंग मशीनमध्ये बदलता येत नाही कारण ही मशीन एक ड्राय क्लिनिंग आहे. मशीनला मेनटेन करणे देखील सोपे आहे. ही मशीन विना साफ न करता 40 वेळा वापरता येते.

Leave a Comment