चांगली नोकरी सोडली म्हणून लोकांनी काढले वेड्यात; आज करतो आहे १०० कोटींची उलाढाल !


कॅनडा : सध्याच्या घडीला आयटी कंपनीत काम मिळण्यासाठी तरुण जीवाच रान करतात पण अशी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून कार्ल रॉड्रीक्स यांनी कॉम्प्यूटर पार्ट्स विकण्याची उलाढाल सुरु केली. पण त्यांच्या समोर एक अशी अडचण होती की त्यांना या व्यवसायातील काहीच माहीत नव्हते. याबाबत आपल्यावर अवलंबून असणाऱ्या बायको आणि सासूला कसे समजवायचे हे आव्हान त्यांच्यापुढे होते. त्यांनी त्यामुळे २००१मध्ये नोकरी थांबवून पूर्णवेळ व्यवसाय करण्याचा निर्धार मनाशी केला. आपल्या स्वप्नांच्या दिशेने उचललेले हे पहिले पाऊल होते. जे काही मी बनवेन ते मला आवडले पाहिजे असे त्यांचे लक्ष्य होते. काय घडते आहे ते त्यांना माहित नव्हते पण त्यांनी स्वप्नांच्या दिशेने भरारी घेण्याच निश्चित केल होते. वेड्यासारखे संशोधन काही महिने केल्यावर त्यांच्या मनात एक आयडीया आली. मोबाईल फोन्स आणि लॅपटॉप कंट्रोल करु शकेल असे सॉफ्टवेअर सिस्टीम बनवायचे ठरवले.

त्यांनी आपल्या कंपनीला सोटी असे नाव दिले गेले. या कंपनीचे काम खुपच संथ गतीने सुरु होते. रॉड्रीक्स यांना तब्बल १२ महिन्यानंतर युकेतील मोठ्या सुपरमार्केट ग्रुपमधून फोन आला. ग्राहकांना त्या फर्मला कॉम्युटर सिस्टीम विकायची नव्हती. सिस्टीमची माहिती कर्मचाऱ्यांना झाल्यास चांगला संवाद होऊ शकेल आणि इतरांपर्यंतही चांगली माहिती पोहोचू शकेल ही त्या फर्मची गरज होती. त्यांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारात अशा कामांसाठी मदत करणाऱ्या माणसाची गरज होती.

सध्या ५५ वर्षाचे रॉड्रीक्स असून ते सोटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. युकेतून जेव्हा त्यांना फोन आला तेव्हा ते त्यांच्या तळघरात बसले होते. त्यांना सेल्स संदर्भात कोणत्यातरी माणसाशी बोलायचे होते. रॉड्रीकस यांनी तेव्हा फोनवर बोलणी केली. २० हजार युनिट्सची मागणी युकेच्या फर्मने केली होती. ‘सोटी’ने त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. या कंपनीचे नाव खुप लोकांनी ऐकले नव्हते कारण मोबाईल टेक्नोलॉजी सिस्टीम ग्राहकांना देण्याऐवजी ते थेट कंपन्यांनाच देत असत. रॉड्रिक्स यांना यासाठी बाहेरुन गुंतवणुकीसाठी पैसा उभारावा लागला नाही. त्यांनी पत्नीच्या मदतीने पूर्ण व्यवसायाचा डोलारा उभारला. त्यांना २००६मध्ये मायक्रोसॉफ्टमधून फोन आला. कॅनेडीअन बिझनेसमॅनला सोटीकडून जेवढे शक्य होईल तेवढी मदत घ्यायची होती.

गोव्यातील पोर्तूगल कॉलनीत पाकिस्तानात जन्मलेल्या रॉड्रीक्स यांचे पूर्वज राहायचे. ११ वर्षाचे असताना त्यांचे नातेवाईक आणि पालकांसोबत कॅनडात स्थायिक झाले. पाकिस्तानात त्यांचे वडिल खुश होते पण आईला ती जागा रॉड्रीक्स याच्या शिक्षणासाठी योग्य वाटत नव्हती. रॉड्रीक्स यांनी शालेय शिक्षण झाल्यानंतर कॉम्युटर सायन्स आणि मॅथेमॅटीक्समध्ये टॉरोंटो विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. ‘सोटी’च्या स्थापनेआधी काही वर्षे त्यांनी सल्लागार म्हणून काम केले होते.

तळघरापासून व्यवसायाला सुरुवात करणाऱ्या रॉड्रीक्स यांचे टॉरॉंटो आणि कॅनडाच्या बॉर्डरला मिसिसॉगा येथे येथे दोन बिल्डींगमध्ये हेडक्वॉटर आहे. आजुबाजुच्या लोकांनी कितीही वेड्यात काढल तरी आपण आपल्या निश्चयावर ठाम असू तर काहीही अशक्य नाही हे रॉड़्रीक्स यांनी दाखवून दिले आहे.

Leave a Comment