आता केवळ एका मेसेजवर बुक करा विमानाचे तिकिट

विमानाचे तिकिट करणे आता अधिक सोपे झाले आहे. केवळ एका मेसेजने आता विमानाचे तिकिट बुक करणे शक्य होणार आहे. तुम्हाला विमानाचे तिकिट बुक करण्यासाठी वेबसाइट अथवा कोणत्याही अ‍ॅपवर जाण्याची गरज नाही. केवळ व्हॉट्सअ‍ॅपच्या एका मेसेजने आता तुमचे विमान तिकिट बुक होईल.

इजी माय ट्रिप (EaseMyTrip) कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक खास व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर सेवा सुरू केली आहे. याद्वारे ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तिकिट बुक करू शकतील.

यासाठी ग्राहकांना 9990330330 या नंबरवर अथवा https://wa.me/919990330330 या लिंकवर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करावा लागेल व हवी असलेली माहिती मागू शकता. व्हॉट्सअ‍ॅपवर सर्च करण्यात आलेले उड्डाणाची माहिती, तिकिट दराची सुचना देखील ग्राहकांना मिळेल. या सेवेमुळे ग्राहकांची वेळेची बचत होईल.

Leave a Comment