मानुषीने शेअर केला ‘पृथ्वीराज’ मधला फर्स्ट लूक


लवकरच अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’मधून मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात मानुषी संयोगिताच्या भूमिकेत दिसणार आहे. तिची झलक तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

मानुषीने २०१७ साली ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला होता. मानुषी २०१७ पासून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चा होत्या. ती अखेर ‘पृथ्वीराज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून अक्षय पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत आहे.

View this post on Instagram

Sanyogita #Prithviraj

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on


सुपरस्टार अक्षय कुमार या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका ऐतिहासिक चित्रपटात भूमिका साकारत आहे. मानुषीने या चित्रपटासाठी अभिनयाचे प्रशिक्षणही घेतले. या चित्रपटाच्या सेटवर नोव्हेंबर महिन्यात मुहूर्तपूजा करण्यात आली. चित्रपटाची संपूर्ण टीम मुहूर्तपूजेत सहभागी झाली होती. हा चित्रपट दिवाळीत रिलीज होणार आहे.

Leave a Comment