जाणून घ्या वाकून पाया पडण्याचे शास्त्रीय कारण


आपल्याकडे वाकून पाया पडण्याची ही फक्त एक परंपरा नसून ही परंपरा स्वतःमध्ये एक विज्ञान आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विज्ञानात या गोष्टी सामावलेल्या आहेत. आपण पाय पडण्यासाठी पुढच्या बाजूला झुकतो आणि आपल्या दोन्ही हाताने पाया पडतो किंवा उजवा हात आणि उजवा पाय पुढे करून पाया पडतो. आपण या प्रक्रियेत ऊर्जा चक्र पूर्ण करत असतो. विज्ञानानुसार आपल्या शरिरात डोक्याकडून ऊर्जेचा प्रवेश होऊन पायाकडे याचा प्रवाह जातो.

डोक्याला उत्तरी ध्रुव आणि पायाला क्षिणी ध्रुव असे विज्ञानात मानले जाते. आपण जेव्हा मोठ्यांच्या पायाला स्पर्श करतो तेव्हा विज्ञानानुसार चुंबकीय उर्जेचा चक्र पूर्ण केला जातो. गुरूत्वाकर्षणाच्या नियमानुसार शरीरातील दक्षिण ध्रुव म्हणजे पायात ऊर्जा केंद्र तयार होते.

पाया पडल्यानंतर ऊर्जेसोबतच अथाह भंडार देखील प्राप्त होतो. यासाठी कायम आई, गुरू आणि आदरणीय व्यक्तिंच्या पाया पडण्यासाठी सांगितले जाते. यामुळे आपल्या शरिरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पाया पडण्यामागील असे विज्ञान हे आहे की पाया पडून आपण दुसऱ्यांप्रती आदर भाव व्यक्त करतो. यामुळे आपल्यातील विनम्रता अधिक वाढते. ज्या व्यक्तीच्या पाया आपण पडतो तो व्यक्ती आशिर्वाद देण्यासाठी आपल्या डोक्यावर हात ठेवतो आणि हाच स्पर्श आपल्याला सुरक्षित असल्याची जाणीव देतात. धार्मिक आचरणाच्या आधारावर बघायला गेले तर मोठ्यांच्या पाया पडल्यामुळे आपल्याला दररोज सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. आयुवृद्धिचे कारण ज्याला समजले जाते.

पाया पडण्यासाठी वाकावे लागते, बसून पाया पडणे स्वतःमध्येच एक व्यायाम केल्यासारखे आहे. असे केल्यामुळे शरीर सक्रिय होते आणि शरीरामध्ये रक्त प्रवाह वाढत जातो. मस्तिष्कमध्ये शरीर संचालित होते. पुढे झुकण्यासाठी डोक्याची नस रक्तातील संचार वाढत असते आणि आपण फ्रेश राहतो. याच कारणामुळे पाया पडल्यामुळे चरण स्पर्शाला धर्म आणि आचरणाची जोड दिली जाते.

Leave a Comment