Video : या मुलाच्या प्रार्थनेमुळे नेटकऱ्यांना आठवले आपले बालपण

लहानपणी शाळेत असताना मैदानावर उभे राहून प्रार्थना होत असे. एका रांगेत उभे राहून, डोळे बंद करून प्रार्थना करावी लागे. मात्र अशावेळी काही मुले कोणाची तरी खोड काढणे, डोळे उघडे ठेवणे, हळूच खिशातून काहीतरी काढून खाणे अशा करामती करत असे. शाळेत असताना सर्वांनीच असे केले असेल. अशाच एका छोट्या मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने या छोट्या मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ सुरू आहे. मुलाने डोळे बंद केले आहेत व हात जोडले आहेत. मात्र त्याच्या हातात लॉलीपॉप आहे व प्रार्थना म्हणताना तो लॉलीपॉप देखील चोखत आहे.

विरेंद्र सेहवागने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, या मुलाचा वेगळाच जलवा आहे. कोणाला याची हरकत पाहून लहानपण आठवले ?

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आतापर्यंत लाखो युजर्सनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

https://twitter.com/AandhiMahatma/status/1219860450369605632

अनेकांना हा व्हिडीओ पाहून आपले लहानपण नक्कीच आठवले असेल. अनेक युजर्सनी यावर भन्नाट कमेंट्स केल्या.

Leave a Comment