भारतातील महिला नेत्या होत आहेत सर्वाधिक ट्रोल, अहवालात आले समोर

सोशल मीडियावर ट्रोलिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याचा सर्वाधिक परिणाम राजकीय महिला नेत्यांवर होताना दिसतो. अ‍ॅमनेस्टी इंडिया इंटरनॅशनलने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे की अमेरिका आणि ब्रिटनच्या तुलनेत भारतातील महिला नेत्यांना सर्वाधिक ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

हा अभ्यास मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान ट्विटरवर डिजिटल गैरवर्तनुकीच्या डेटावर आधारित आहे. अ‍ॅमनेस्टी इंडिया इंटरनॅशनलने यामध्ये मार्च 2019 ते मे 2019 मधील 1,14,716 ट्विटचे निरिक्षण केले. यामध्ये 95 टक्के महिला नेत्यांचा समावेश होता. यातील 13.8 टक्के ट्विट हे अपमानजनक आणि समस्या निर्माण करणारे होते.

अ‍ॅमनेस्टी इंडिया इंटरनॅशनलने सांगितले की यातील 95 महिला नेत्यांपैकी 44 भारतीय जनता पक्षाच्या होत्या. 28 काँग्रेस आणि 23 इतर पक्षांच्या होत्या. सोशल मीडियावर त्यांच्या निर्णयांवर टीका करण्यासोबत त्यांना अपमानित देखील केले जाते.

Leave a Comment