पिझ्झामध्ये थुंकणाऱ्या डिलिव्हरी बॉयला झाली एवढ्या वर्षांची शिक्षा

सध्या ऑनलाईन जेवण मागवण्याचा ट्रेंड वाढला आहे. मात्र हॉटेलमधून आपल्यापर्यंत जेवण पोहचेपर्यंत ते कोणत्या प्रक्रियेतून जाते हे आपल्याला माहिती नसते. अनेकदा डिलिव्हरी बॉयने पदार्थ काढून खाल्ल्याचे आपण अनेकदा ऐकतो. मात्र तुर्कस्तानमधील एका डिलिव्हरी बॉयने यापेक्षा पुढील कृत्यू केले आहे.

तुर्कस्तानमधील एका डिलिव्हरी बॉयला पिझ्झामध्ये थुंकल्यामुळे तब्बल 18 वर्षांचा कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. ग्राहकाला डिलिव्हरी करताना पिझ्झामध्ये थुंकल्याचा आरोप त्याच्यावर आरोप आहे. दोषीला याआधीच जवळपास 4000 लीरा (जवळपास 48 हजार रुपये) दंड ठोठवण्यात आला आहे. त्याने ग्राहकाचे आरोग्य धोक्यात घातले, असे सांगत न्यायालयाने ही शिक्षा दिली.

ही घटना वर्ष 2017 ची आहे. तुर्कस्थानच्या एस्किशर शहरातील ग्राहकाच्या अपार्टमेंटमध्ये लागलेल्या कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली. ही घटना ग्राहकाला ग्राहकाला पिझ्झा देण्याआधी घडली. फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की बुराक एस नावाचा डिलिव्हरी बॉय पिझ्झामध्ये थुंकला व आपल्या फोनमध्ये रेकॉर्डिंग देखील केले. बुराकने असे का केले हे अद्याप समजू शकले नाही.

Leave a Comment