या ठिकाणी लागली देशातील पहिली ‘स्मार्ट नेम प्लेट’

देशातील पहिली स्मार्ट नेम प्लेट मध्यप्रदेशमधील उज्जैन शहरात लावण्यात आलेली आहे. ही पाटी कृष्णादेवी अग्रवाल यांच्या घरावर लावण्यात आली आहे. या स्मार्ट नेम प्लेटवर क्यूआर कोड देण्यात आलेला आहे. या कोडद्वारे महापालिकेची कचऱ्याची गाडी आली होती की नाही याची माहिती मिळेल. या व्यतरिक्त किती मालमत्ता कर भरण्याचा बाकी आहे हे ही समजेल. तीन महिन्यानंतर क्यूआर कोडच्या माध्यमातूनच ऑनलाईन कर देखील भरता येईल.

स्मार्ट सिटी कंपनी एका खाजगी बँकेच्या मदतीने शहरातील 1.20 लाख घरांना ही नेम प्लेट लावणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

उज्जैनच्या महापौर मीना जोनवाल म्हणाल्या की, स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून शहरात स्मार्ट सुविधा दिल्या जात आहेत. याच अंतर्गत पहिली स्मार्ट नेम प्लेट लावण्यात आली आहे. संपुर्ण शहरात ही पाटी लावली जाईल.

या स्मार्ट नेम प्लेटचे भविष्यात अनेक फायदे आहेत. याद्वारे कचऱ्याची गाडी आली की नाही याची माहिती मिळेल. मालमत्ता कर, पाणीकर, विजेचे बिल व अन्य शुल्क ऑनलाईन भरता येतील.

Leave a Comment