ब्रेक्झिट कायद्यास ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांची औपचारिक मंजुरी


लंडन – दिवसागणिक ब्रेक्झिट प्रकरण नवीन वळणे घेत असून ब्रेक्झिट या महत्त्वपूर्ण कायद्यास ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांनी औपचारिक मान्यता दिल्याची माहिती ब्रेक्झिट सेक्रेटरी स्टीव्ह बर्कले यांनी टि्वट करून दिली आहे.

ब्रेक्झिट विधेयकास ब्रिटनच्या संसदेने मान्यता दिल्यानंतर ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांनी ब्रेक्झिट या महत्त्वपूर्ण कायद्यास औपचारिक मंजूरी दिली. त्यानुसार ब्रिटन हा 31 जानेवारीला युरोपीय महासंघातून बाहेर पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. ब्रिटनचा युरोपीय महासंघात प्रवेश उशिराने झाला आणि त्यातून प्रथम बाहेर पडणारे तेच राष्ट्र ठरणार असून ब्रेक्झिट सार्वमत माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरूनच्या कारकीर्दीत घेण्यात आले होते. पण ब्रेक्झिटला पाठिंबा देणारे जनमत रोखण्यात त्यांना अपयश आले होते.

Leave a Comment